Bhausaheb Patil Chikatgaonkar : भाऊसाहेब पाटिल चिकटगावकरानी बांधले शिवबंधन... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhausaheb Patil Chikatgaonkar join uddhav thackeray shivsena leave ncp politics

Bhausaheb Patil Chikatgaonkar : भाऊसाहेब पाटिल चिकटगावकरानी बांधले शिवबंधन...

वैजापुर : तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब पाटिल चिकटगावकर यांनी आखेर राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करत बुधवारी (ता.१४) ठाकरे गटाच्या शिवसेनेत मुंबई येथे झालेल्या प्रवेश सोहळ्यात जाहिर प्रवेश करत पक्ष प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधले. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,माजी मंत्री सुभाष देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्टींनी ठोंबरे काका – पुतण्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिल्याने माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांनी नाराजी व्यक्त करून सर्व पर्याय खुले असल्याचे काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत सांगितले होते.

त्यानंतर त्यांनी संपूर्ण तालुक्यात संपर्क दौरा आयोजित करून पुढे काय करावे पक्ष सोडावा की नाही पक्ष सोडल्यास कोणत्या पक्षात प्रवेश घ्यावा. यासंदर्भात कार्यकर्ते व समर्थकांची मते जाणून घेतली. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये प्रवेश घ्यावा असे मत या दौऱ्यात व्यक्त कार्यकर्त्यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे माजी आमदार चिकटगावकर यांनी आखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बुधवारी सोडचिठ्ठी देत आपल्या समर्थकांसह शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षात शिवबंधन बांधले.मुंबई येथे मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.