Buldana : भव्य वारकरी भवनाचे बुलडाण्यात भूमिपूजन

आमदार गायकवाड यांचे प्रयत्न संत महंतांची प्रमुख उपस्थिती
Buldana
Buldanasakal

बुलडाणा : आमदार संजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून बुलडाणा शहरांमध्ये सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार्‍या भव्य अशा वारकरी भवनांचे भूमिपूजन आज वृंदावन उमाशक्ती पिठाचे शंकराचार्य श्रीरामदेवानंद जी सरस्वती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि धार्मिक क्षेत्रातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

खासदार प्रतापराव जाधव, नाशिक येथील आचार्य मठाधिपती डॉ. रामकृष्ण महाराज लवहितकर, देवाची आळंदी येथील वारकरी भवनाचे अध्यक्ष ह भ प रामेश्वर महाराज शास्त्री, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वंशज देहू संस्थांचे अध्यक्ष ह भ प नितीन महाराज मोरे, हिंदू धर्म प्रचारक श्यामजी महाराज ह भ प बाबुराव महाराज वाघ, हरि चैतन्यानंद जी महाराज, पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानचे विश्वस्त हरिभक्त परायण प्रकाश बुवा जवंजाळ, ह भ प तुकाराम महाराज शिरपूरकर, राजेंद्र महाराज तळेकर, वारकरी महामंडळाचे

जिल्हाध्यक्ष ह भ प दामू अण्णा शिंगणे, भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सिताराम महाराज ठोकळ, योगी अमोलानंद महाराज, डॉ. विकास बाहेकर यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती मागील हनुमान व्यायाम मंडळाच्या प्रशस्त प्रांगणामध्ये हा कार्यक्रम झाला.

यावेळी युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड, पूजाताई गायकवाड, जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, युवा सेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, संदीप गायकवाड, मुन्ना बेंडवाल, धर्मवीर युथ फाऊंडेशनचे पृथ्वीराज गायकवाड, शिवसेना महिला शहर प्रमुख वैशाली ठाकरे, नगरसेवक आशिष जाधव, विजय जायभाये यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळी, भजनी दिंड्यांचे सदस्य व महिला भगिनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com