esakal | गोठ्यात आगीचे तांडव! जनावरांचा चारा, खत व शेती अवजारे,लाखोंचा माल जळून खाक

बोलून बातमी शोधा

aag

गावाबाहेरील गोठ्याला मध्यरात्री १:३० वाजता शार्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत गोठा पूर्णपणे जळून खाक झाला असून यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

गोठ्यात आगीचे तांडव! जनावरांचा चारा, खत व शेती अवजारे,लाखोंचा माल जळून खाक
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजुरा (चंद्रपूर) : उन्हाळ्याच्या दिवसात आगी लागण्याचे प्रमाण खूप वाढते.
राजुरा तालुक्यापासून पंधरा किमी अंतरावर असलेल्या साखरी येथील देवराव नानाजी पोडे यांच्या गावाबाहेरील गोठ्याला मध्यरात्री १:३० वाजता शार्टसर्किटमुळे आग लागली. या आगीत गोठा पूर्णपणे जळून खाक झाला असून यात लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
देवराव पोडे यांचा गावालगत निर्ली रस्त्यावर सिमेंट, विटा व टीनपत्र्याचा मोठा गोठा होता, त्यात शेतीउपयोगी अवजारे, जनावरांचा चारा व रमेश निमकर यांच्या मालकीच्या १५० युरिया खतांच्या बॅग व पाच प्लास्टिक ड्रम  ठेवलेले होते.  (दि. २९) मध्यरात्री सर्वत्र शांतता असताना व गाव गाढ झोपेत  असताना १:३० वाजताच्या दरम्यान गोठ्याजवळ शार्टसर्किटमुळे विस्तावाची ठिणगी पडली व आजूबाजूच्या कचऱ्याला आग लागली. या आगीने गोठ्याला विळख्यात घेतले. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले असता नजीक असलेल्या नागरिकांना आगीचे लोंढे व मोठा उजेड दिसू लागला, आजूबाजूला ओरडून आग लागल्याचे सांगितले असता परिसरातील नागरिकांनी गोठ्याकडे धाव घेत गोठ्याच्या बाहेर बांधलेली जनावरे मोकळी केली. आगीची वार्ता पोहोचताच  नागरिक गोठ्याकडे धावू लागले मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही. काही क्षणामध्येच आगीच्या विळख्यात रमेश निमकर यांची युरिया खताच्या १५० बॅग, पाच प्लास्टिक ड्रम, देवराव पोडे यांच्या जनावरांचा चारा, कडबा, कुटार, शेतीउपयोगी अवजार नांगर, वखर यासह गोठ्याच्या बांधकामात वापरलेले सागवान फाटे, टीनपात्रे सर्व जळून खाक झाले. देवराव पोडे व रमेश निमकर त्यांचे मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
 सविस्तर वाचा - ...आणि आयुक्त तुकाराम मुंढे पोचले जनतेत; केले हे आवाहन
तोंडावर शेतीचा हंगाम आला असून यात शेतीउपयोगी अवजार, जनावरांचा चारा व खतांचा केलेला साठा यांचे नुकसान झाल्याने पोडे व निमकर यांच्यासमोर मोठे संकट उभे झाले आहे. घटनेचा पंचनामा तलाठी आशा भोयर यांनी केला असून नुकसानीची भरपाई मिळण्याची मसगणी निमकर व पोडे कुटुंबीयांनी केली आहे.