Teacher Recruitment : राज्याला मिळणार आठ हजार नवे शिक्षक; नव्या सत्रात खुशखबर अडीच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बेरोजगारांना लॉटरी
Yavatmal News : राज्यात तब्बल ८,२६४ शिक्षकांची भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलवरून सुरू झाली आहे. दोन वर्षांहून अधिक काळ प्रतिक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी खुशखबर आहे.
यवतमाळ : अडीच वर्षांपूर्वी अभियोग्यता परीक्षा दिलेल्या हजारो बेरोजगारांना आता नोकरीची लॉटरी लागणार आहे. खासगी शिक्षण संस्थांमधील पद भरतीची प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारे सुरू झाली असून यातून ८ हजार २६४ शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत.