esakal | राकेश टिकैत यांच्या सभेला परवानगी नाकारण्यामागे मोठं षड्‌यंत्र; विरोधानंतरही संयुक्त किसान मोर्चाची धडक
sakal

बोलून बातमी शोधा

Big strategy against denying permission to Rakesh Tikait rally in Yavatmal

यावेळी तेजवीर सिंह, अमरदीप सिंह यांचेसह संयुक्त किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे राष्ट्रीय नेते राकेश टीकेत यांच्यासह शेतकरी नेते यांची शनिवारी (ता. 20) आझाद मैदानावर किसान महामेळाव्याला संबोधित करणार होते

राकेश टिकैत यांच्या सभेला परवानगी नाकारण्यामागे मोठं षड्‌यंत्र; विरोधानंतरही संयुक्त किसान मोर्चाची धडक

sakal_logo
By
राजकुमार भितकर

यवतमाळ : शेतकऱ्यांच्या हितासाठी आंदोलन करीत असतानाही केंद्र शासनाकडून षड्‌यंत्र करून सभा होऊ दिल्या जात नाही. देशात कुठेही कोरोना नसताना सभा आहेत, त्याठिकाणीच कोरोना कसा? असा प्रश्‍न उपस्थित करीत संयुक्त किसान मोर्चाचे प्रवक्ता गुरमित सिंह यांनी केंद्र शासनावर हल्लाबोल केला आहे. यानंतर शेतकरी नेत्यांना अटक करण्यात आली.

हेही वाचा - ‘सुपर स्प्रेडर’मुळे कोरोनाचा धोका जास्त; दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आलेल्यांचे नमुने ‘...

यावेळी तेजवीर सिंह, अमरदीप सिंह यांचेसह संयुक्त किसान मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांचे राष्ट्रीय नेते राकेश टीकेत यांच्यासह शेतकरी नेते यांची शनिवारी (ता. 20) आझाद मैदानावर किसान महामेळाव्याला संबोधित करणार होते. कोरोनाचे कारण देत प्रशासनाने सभेला परवानगी नाकारली. यानंतरही पदाधिकाऱ्यांनी यवतमाळकडे कूच केली आहे. 

जिल्ह्याच्या सीमेवर पोलिस प्रशासनाकडून आंदोलकांची समजूत काढण्यात आली आहे. त्यानंतर आंदोलनातील काही नेत्यांनी सभास्थळी धडक दिली. मात्र, सकाळपासूनच आझाद मैदान परिसर बंद करण्यात आले. शहरात तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालय, आझाद मैदान परिसर याठिकाणी पोलिसांचा फौज फाटा होता. 

हेही वाचा - कुटुंबीयांसोबतचे 'ते' जेवण ठरले अखेरचे, घराच्या दिशेने निघालेल्या 'बरखा'वर...

याठिकाणी उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाचे नेते गुरुमित सिंह, तेजवीर सिंह तसेच अमनदीप सिंह यांचे सहअनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. राष्ट्रीय किसान मोर्चाचे राकेश टीकेत, तसेच अन्य नेते नागपूरहून वर्धामार्गे यवतमाळात मेळाव्याला येणार होते. कोरोनामुळे सभा न घेण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याने शेतकरी नेत्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे जाहीर सभा रद्द करण्यात आली. शेतकरी कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी शेतकरी नेत्यांनी आझाद मैदान येथे येऊन केंद्र शासनाचा निषेध नोंदविला.

संपादन - अथर्व महांकाळ