Nag Panchami 2025: विषारी सापाचा चावा बसल्यानंतरही धाडसी सर्पमित्राची सेवा अखंड सुरूच; नागपंचमीच्या निमित्ताने समाजासमोर आदर्श
Snake Conservation: येरखेडा, कामठी येथील सर्पमित्र संजय गटलेवार यांनी गेल्या ३० वर्षांत हजारो साप वाचवले. कोणतंही औपचारिक प्रशिक्षण न घेता त्यांनी स्वतः शिकून सर्प ओळख विकसित केली.
कामठीः नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर सापांविषयी अनेक श्रद्धा-अंधश्रद्धा ऐकायला मिळतात, पण येरखेडा (ता. कामठी) येथील ५० वर्षीय सर्पमित्र संजय गटलेवार यांनी गेल्या तीन दशकांत हजारो सापांना जीवनदान देत समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.