BJP Amravati City President Appointment
esakal
अमरावती : भारतीय जनता पक्षातील अंतर्गत मतभेद चांगलेच चव्हाट्यावर आले असून शहर जिल्हा भाजप अध्यक्ष कोण? असा प्रश्न कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तूळात उपस्थित झाला आहे. डॉ. नितीन धांडे यांना हटवून नितीन गुडधे यांची नियुक्ती करण्यात आली असतानाच या नियुक्तीला चोवीस तासांत स्थगिती देण्यात आली. प्रदेशाध्यक्ष पातळीवर हा निर्णय स्पष्ट झालेला नसल्याने दोन्ही नितीनचे भविष्य अधांतरी लटकले आहे.