Video : केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या गावात कमळ कोमेजले

sanjay dhotre
sanjay dhotre

अकोला : जिल्हा परिषदेसह त्याअंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.7) ग्रामीण भागात मतदान प्रक्रिया पार पडली. बोचऱ्या थंडीत सुद्धा मतदारांनी उत्साहात मतदान केले. मतदानानंतर बुधवारी (ता.8) मतमोजणी सुरू झाली. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या गावात पंचायत समिती गणांमध्ये भाजपचे उमेदवार पराभूत झाले असून भारिप बहुजन आघाडीचे वसंतराव नागे निवडून आल्याने केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या गावात कमळ फुललेच नसल्याने मोठ्ठा धक्का बसला आहे.

मिनिमंत्रालय अर्थात जिल्हा परिषदेवर गत 20 वर्षांपासून भारिप-बमसंची सत्ता आहे. यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये भारिप-बमंसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी स्वबळावर तर कधी आघाडी, युती करून निवडणुका लढल्या; परंतु सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचा गढ भारिपने अबाधित राखण्याचे काम केले. यावेळी सुद्धा भारिपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वंच राजकीय पक्षांनी कंबर कसली होती. त्यामुळेच निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सहा तालुक्यांत आघाडी करून लढली, तर मूर्तिजापूर तालुक्यात शिवसेनासुद्धा त्यांच्या आघाडीत सहभागी झाल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेवर सदर तिन्ही पक्ष सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे चित्र होते. भाजप संपूर्णत: स्वळावर मैदानत असून, भाजपने सर्वच गट, गणांमध्ये उमेदवार उभे केले होते.

हेही वाचा - ‘ती’ आठवीतच रेखाटते वास्तववादी चित्रं

असा आहे निकाल -पळसो बढे पंचायत समिती गण
वसंत नागे - भारिप - 3168
मनिष गावंडे - भाजप - 1535

नेत्यांची प्रतिष्ठापणाला
जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या भाजपची शक्ती सर्वाधिक आहे. एक खासदार, पाच पैकी चार आमदार असून, महापालिका, तीन नगर पालिकाही ताब्यात आहेत. शिवसेनेचा एक आमदार आहे. जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे खासदार, सर्व आमदार, शिवसेनेचे आमदार, संपर्क प्रमुख प्रचारात उतरले होते. लोकसभा-विधानसभा एकत्र लढलेले भाजप-शिवसेना या निवडणुकीत मात्र एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. याव्यतिरिक्त ‘वंचित’चे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर विभानसभेत सुद्धा त्यांचा एकही आमदार निवडून न आल्याने ॲड. आंबेडकरांची प्रतिष्ठा सुद्धा या निवडणुकीत पणाला लागली होती. दरम्यान वंचितने दुपारी दोनपर्यंत आघाडी कायम ठेवली असून मिनिमंत्रालयावर पुन्हा भारिपचाच झेंडा फडकणार असल्याचे चित्र आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com