भाजप "इलेक्‍शन मोड'मध्ये

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 28 July 2019

नागपूर : शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन, तयार झालेल्या प्रकल्पांच्या उद्‌घाटनाचा धडाका सुरू झाला असून रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे दिवसभर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप राज्यभरात जोरकसपणे "इलेक्‍शन मोड'मध्ये असून मुख्यमंत्र्यांचे गृहनगरही त्याला अपवाद नाही.

विधानसभा निवडणूक दिवाळीपूर्वी होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळताहेत. त्यादृष्टीने विविध कामांचे भूमिपूजन, तयार झालेल्या प्रकल्पांच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम भाजपने तयार केला आहे. संत्रानगरी शैक्षणिक हब होण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या वाठोडा येथील सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी नागपूर कॅम्पसचे उद्‌घाटन उद्या, 28 रोजी करण्यात येणार आहे. सकाळी अकराला होणाऱ्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय दुपारी तीनला अंबाझरी बायोडायव्हर्सिटी पार्कचे उद्‌घाटन उभय नेत्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वनराज्यमंत्री डॉ. परिणय फुके उपस्थित राहणार आहेत. नुकताच भाजपची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत विधानसभा निवडणुकीत बहुमताने सत्ता काबीज करण्याची व्यूहरचना तयार करण्यात आली. त्यानुसार, तयार झालेल्या प्रकल्पांचे आचारसंहितेपूर्वी उद्‌घाटन, प्रस्तावित प्रकल्पांचे भूमिपूजन पार पाडण्याचेही ठरविण्यात आले. मुंबईत भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी सर्व 288 जागा लढण्याचे संकेत दिले होते. त्यादृष्टीने भाजपने निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP in Election mode