Yavatmal: २० कोटीत केंद्रीय राज्यमंत्री दर्जा, थेट दिल्लीतून कॉल येईल; आमिष दाखवून फसवणूक, भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिसात धाव

Alleged Offer of Union Minister Rank for Money: यवतमाळमध्ये केंद्रीय राज्यमंत्री दर्जाचे पद मिळवून देण्याचे आमिष दाखवत २० कोटी ५० लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
Yavatmal

Yavatmal

esakal

Updated on

यवतमाळ: केंद्रीय राज्यमंत्री पदाचा दर्जा देवू, असे म्हणून भाजप जिल्हा समन्वयकांना फसविण्याचा तिघांनी प्रयत्न केला. परंतु, जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांनीच केलेल्या 'स्टिंग' मुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी अवधूतवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांनाही बेड्या ठोकल्या. लौकिक जगन्नाथ फुलकर (रा. नेताजी नगर), गणेश लालसिंग राठोड (रा. दाभा पहूर, बाभूळगाव), विश्वजित सुरेश राठोड (रा. ब्राम्हणवाडा, आर्णी) अटक केली. तर तिघांनाही तीन दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com