

BJP leader liquor seizure
esakal
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांच्या घरी तब्बल ४५ पेट्या अवैध दारू सापडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपचे नेते तसेच भाजप युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता मधुकर भांडेकर यांच्या वालसरा (ता. चामोर्शी) येथील निवासस्थानी पोलिसांनी मंगळवार (ता. ११) पहाटे छापा टाकला. या छाप्यात देशी दारूच्या पेट्या जप्त करण्यात आल्या असून, पोलिसांनी एकूण ४५ पेट्या दारू जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात तसेच समाजमाध्यमांवर मोठी चर्चा रंगली आहे.