Gadchiroli : भाजप नेत्याचा अपघाती मृत्यू, महिन्याभरापूर्वी उधळलेला विजयी गुलाल

Mukteshwar Katwe : भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि नगरपरिषदेचे आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे यांचा शुक्रवारी रात्री १० वाजता अपघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या काटवे यांचं उपचारावेळी निधन झालं.
BJP Leader Mukteshwar Katwe Dies In Accident

BJP Leader Mukteshwar Katwe Dies In Accident

Esakal

Updated on

गडचिरोलीत दुचाकीच्या आडवं डुक्कर आल्यानं झालेल्या अपघातात भाजपच्या माजी शहराध्यक्षाचा मृत्यू झाला आहे. भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि नगरपरिषदेचे आरोग्य सभापती मुक्तेश्वर काटवे यांचा शुक्रवारी रात्री १० वाजता अपघात झाला. महिन्याभरापूर्वीच नगरपरिषदेचे आरोग्य सभापती म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता. गडचिरोलीतल्या कारगिल चौकात गाडीच्या आडवं डुक्कर आल्यानंतर नियंत्रण सुटून त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com