राज ठाकरे सक्षम, जनतेने त्यांचा विचार करावा : नितीन गडकरी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 16 October 2019

आयारामांमुळे भाजपची संस्कृती बदलेल....
यावेळी गडकरींना भाजपत प्रवेश करणाऱ्या आयारामांबाबत विचारले असता, ते म्हणाले की, एकतर आयारामांमुळे भाजपची संस्कृती बदलेल किंवा भाजपमुळे आयारामांची संस्कृती बदलेल. वेळेप्रमाणे पक्षाचा विस्तारही महत्त्वाचा आहे. नागपूरमधील भाजपचे 90 टक्के पदाधिकारी काँग्रेसचे आहेत. पण त्यांनी आता पक्षाची संस्कृती स्विकारली आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

नागपूर : सध्या विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय नितीन गडकरी महाराष्ट्रात फारसा प्रचार करताना दिसत नाहीत. अशातच गडकरी चर्चेत आले आहेत ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे कौतुक केल्याने! सध्या राज ठाकरे यांचा महाराष्ट्र भरात जोरदार प्रचार सुरू आहे. सक्षम विरोधी पक्ष हवा असल्यास मनसेला मत द्या असे आवाहन राज ठाकरे सर्व सभांमध्ये करत आहेत. ते स्वतः निवडणूकीच्या प्रचारात उतरले असून आपल्या उमेदवारांसाठी सभा घेत आहे.
 
राज ठाकरेंची ही सर्व धडपड बघून नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले की, लोकशाहीत सत्तारूढ पक्षासह विरोधी पक्षही तितकाच महत्त्वाचा आहे. राज ठाकरे सक्षम आहेत, त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यांची राजकीय भूमिका थोडी चुकली असली तरी त्यांना विरोधी पक्ष बनण्याची त्यांची इच्छा आहे, त्यामुळे जनतेने त्यांचा विचार करावा, असे वक्तव्य गडकरी यांनी केले. त्यामुळे गडकरींनी थेट राज ठाकरेंचे कौतुक केल्याने या गोष्टीची चर्चा होत आहे.

आयारामांमुळे भाजपची संस्कृती बदलेल....
यावेळी गडकरींना भाजपत प्रवेश करणाऱ्या आयारामांबाबत विचारले असता, ते म्हणाले की, एकतर आयारामांमुळे भाजपची संस्कृती बदलेल किंवा भाजपमुळे आयारामांची संस्कृती बदलेल. वेळेप्रमाणे पक्षाचा विस्तारही महत्त्वाचा आहे. नागपूरमधील भाजपचे 90 टक्के पदाधिकारी काँग्रेसचे आहेत. पण त्यांनी आता पक्षाची संस्कृती स्विकारली आहे, असे गडकरी यांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP leader Nitin Gadkari talked about Raj Thackeray in Nagpur