देशाची लोकशाही धोक्यात : अशोक चव्हाण

देशाची लोकशाही धोक्यात : अशोक चव्हाण

आर्वी (वर्धा) : देशाची लोकशाही धोक्यात आली असून, सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे राज्यात अवडंबर माजवून भाजपचे षड्यंत्र समीकरण सुरू झाले आहे. मोदी म्हणतात, 'चाय-चाय' आणि योगी म्हणतात 'गाय-गाय'. त्यामुळे आता यांनाच बाय-बाय करण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केले. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्रातील घोषणाबाजी व निरर्गत भाजपच्या सरकारच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात जन संघर्ष यात्रेला सुरवात झाली असून, मंगळवारी (ता.4) येथील गांधी चौकात रात्री साडेआठ वाजता या जनसंघर्ष यात्रेचे आगमन झाले. त्याप्रसंगी जाहीर सभेत अशोक चव्हाण बोलत होते.

यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, विलास मुत्तेमवार, माजी मंत्री अशोक पाटील, माणिकराव ठाकरे, आमदार नसीम खान, महिला अध्यक्ष चारुलता टोकस, आमदार रणजित कांबळे, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार अमर काळे, शेखर शेंडे, आमदार यशोमती ठाकूर, सचिन सावंत, विकास ठाकरे, सुनील कोल्हे, राष्ट्रवादीचे माजी आमदार राजू तिमांडे आदी अनेक  मान्यवरांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांचा अभ्यास सुरूच असून, कर्जमाफी पेट्रोल-डिझेल दरवाढ नोकरीच्या समस्या शेतकऱ्यांच्या अडचणी अद्यापही तशाच आहे. निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने देतील. आचारसहिता सुरू झाली सर्वच बंद होईल, सुप्रीम कोर्टात याचिका दाखल असूनही त्यावर निर्णय नसूनही रामाला आता या निवडणुकीत उतरवले. एवढे वर्षात महात्मा गांधी आठवले नाही आता आठवले, काँग्रेसच्या अनेकांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान दिले. यांचे कोणते योगदान ? आता स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. जातीयवाद फोफावत आहे.

'हवा का मामुली झोका आंधी नही हो सकता चरखा घुमाने से कोई महात्मा गांधी नही हो सकता', असे सांगून भाजपला प्रत्युत्तर देण्याची ताकत जनता जनार्दन सामान्य नागरिकांत आहे. सीबीआय, आयपीएस, न्यायाधीश या तीन संवैधानिक संस्था कोर्टात जातात. तर आपले जनसामान्यांचे काय ? याचा विचार आता नागरिकांनी करावा, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

बाळासाहेब थोरात यांनी ज्यावेळी काँग्रेस अडचणीत आली.  त्यावेळी त्यावेळी विदर्भ खंबीरपणे उभा राहिला व साथ दिली आतापर्यंत केलेला देशाचा विकास हा काँग्रेसनेच केला हे विसरता कामा नये, असे सांगितले. 

आमदार नसीर खान, माजी मंत्री अशोक पाटील, महिला अध्यक्ष चारुलता टोकस यांनीही आपले विचार मांडले. आमदार अमर काळे यांना लोकहितासाठी निवडून देण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी भाजपच्या अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जाहिररित्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांना यावेळी तलवार भेट देण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com