Video : भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन, अडविल्या दुधाच्या गाड्या!

सुरेंद्र चापोरकर
शनिवार, 1 ऑगस्ट 2020

राज्यात कोरोनामुळे लॉकडाउन असताना सर्व दुकाने, हॉटेल्स बंद असल्याने शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आज अमरावती येथे भाजप व किसान मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावर दुधाच्या गाड्या अडवून सरकार विरोधी घोषणा देत आंदोलन केले.

अमरावती : कोरोनाचा फटका इतर व्यवसायाप्रमाणेच शेतीपुरक व्यवसायांनाही बसला आहे. परिणामी दूधाचे भाव आणि खप घसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाला भाव मिळण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी दुधाच्या गाड्या अडवून आंदोलन केले.
राज्यात कोरोनामुळे लॉकडाउन असताना सर्व दुकाने, हॉटेल्स बंद असल्याने शेतकऱ्यांच्या दुधाला योग्य भाव मिळत नसल्यामुळे आज अमरावती येथे भाजप व किसान मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावर दुधाच्या गाड्या अडवून सरकार विरोधी घोषणा देत आंदोलन केले.

 

महाराष्ट्रात दररोज दुधाचे उत्पादन 1 कोटी 40 लाख लिटरच्या आसपास होते. कोरोनाच्या संकटामुळे दूध व्यवसाय अडचणीत सापडला आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे राज्यातील सर्व हॉटेल्स, स्वीटहोम, चहाटपरी, डोमिनोज्स पिज्जा अशाप्रकारे दूध व दुधाच्या पदार्थांची विक्री करणारी साधने बंद झालेली आहेत. परिणामी 20 मार्च 2020 पासून पिशवी पॅकिंग दुधाचा खप 30 ते 35 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आलेला आहे. तसेच दुधाच्या प्रॉडक्‍टची विक्री 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आलेली आहे.

सविस्तर वाचा - वडील घरी आल्यानंतर चटकन पाण्याचा ग्लास घेऊन येणारी श्रृती आज धावत बाहेर आली नाही...

दुधाचे दर कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास अडचण येत आहे. तरी राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर 10 रुपये अनुदान द्यावे अथवा गायीचे दूध प्रती लिटर 30 रुपये दराने खरेदी करावे, यांसह अन्य मागण्यांसाठी अमरावती येथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रीय महामार्गावर दुधाच्या गाड्या अडवून आंदोलन केले. या वेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. झोपलेल्या सरकारला जाग येत नसेल तर लोकप्रतिनिधींच्या घरातील दूध बंद करू, असा इशारा माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी या वेळी दिला.
संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJPs milk movement in Amaravati