esakal | वर्धा शहरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

वर्धा शहरात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वर्धा : शहरातील हवालदारपुरा येथे असलेल्या या एका ट्रॅव्हल एजन्सीत रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी या एजन्सीवर छापा घालत कारवाई केली. यावेळी नवीन आणि जुन्या अशा एकूण 74 हजार 718 रुपयांच्या तिकिटा जप्त करून एजन्सी चालकाला अटक केली आहे.
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे अनेक आहेत. यावर रेल्वे प्रशासनाच्या वतीने आळा घालण्याचा प्रयत्न होत आहे. पण, त्यांना अपयश येत असल्याचे या प्रकारावरून दिसून आले आहे. रेल्वे स्थानकावर हा प्रकार कमी असला तरी रेल्वे प्रशासनाच्या वतीने नागरिकांच्या सुविधेकरिता देण्यात आलेल्या केंद्रांवर हा प्रकार सुरू असल्याचे दिसून आले आहे. असाच प्रकार स्थानिक हवालदारपुरा येथील एनआयआर ट्रॅव्हल एजन्सीमध्ये सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळाली. यावरून नागपूर आणि वर्धा रेल्वे पोलिसांच्या मदतीने या एजन्सीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत रेल्वे पोलिस आणि रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 22 हजार 890 रुपयांच्या 15 तिकिटा आणि 51 हजार 828 रुपयांच्या जुन्या तिकिटा जप्त केल्या. या कारवाईत दुकान मालक अभिमन्यू रामटेके याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर रेल्वे कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

loading image
go to top