esakal | Big Breaking : वर्ध्यातील उत्तम गाल्व्हा कंपनीत भीषण स्फोट, 38 जण गंभीर जखमी; कठोर कारवाईचे पालकमंत्र्यांचे निर्देश
sakal

बोलून बातमी शोधा

blast at uttam galva company in wardha

आज सकाळ कामगार काम करत असताना अचानक स्फोट झाला. त्यामध्ये 38 कामगार जखमी झाले.

Big Breaking : वर्ध्यातील उत्तम गाल्व्हा कंपनीत भीषण स्फोट, 38 जण गंभीर जखमी; कठोर कारवाईचे पालकमंत्र्यांचे निर्देश

sakal_logo
By
टीम ई सकाळ

वर्धा : शहरानजीक असलेल्या भूगाव येथील उत्तम गाल्व्हा या स्टील कंपनीत सकाळच्या सुमारास भीषण स्फोट झाला असून यामध्ये कर्तव्यावर असणारे 38 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना सावंगीच्या दत्ता मेघे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यामध्ये जखमींचा आकडा वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, कंपनीच्या सुरक्षा रक्षकांकडून पत्रकारांना धुक्काबुक्की करण्यात आली. 

हेही वाचा - काळजात धस्स करणारी हिंगणघाटची घटना; काय घडले होते...

आज सकाळी कामगार काम करत असताना अचानक स्फोट झाला. त्यामध्ये 38 कामगार जखमी झाले. आणखी जखमींची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सावंगी ठाणेदार रेवचंद शिंगांनजुडे आपल्या चमुसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. फर्निशचा स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

अपघातास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश - पालकमंत्री

उत्तम गाल्वा मेटॅलिक्स या कंपनीमध्ये  फरनेसमधील गरम हवा व राख अंगावर आल्यामुळे 38 कामगार जखमी झालेले आहेत. सदर अपघात गंभीर स्वरुपाचा असून या अपघातात जखमी झालेल्या कामगारांना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील यांनी दिलेत. तसेच सदर अपघाताची औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय यांचेमार्फत कारखाने अधिनियम १९४८च्या तरतूदीनुसार तसेच सरकारी कामगार अधिकारी यांचे मार्फत वेतन प्रदान नियम व कामगार विमा नियमाच्या अनुषंगाने तसेच महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या मार्फत तपासणी करुन अपघातास जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले आहेत.

घटनेची शहानिशा करा - खासदार तडस

खासदार रामदास तडस हे अधिवेशनासाठी दिल्लीला गेले आहेत. मात्र, त्यांच्यासोबत दुरध्वनीद्वारे संपर्क साधला असता जखमींवर चांगले उपचार करून काळजी घ्यावी. तसेच घटनेच शहानिशा करावी, अशी प्रतिक्रीया त्यांनी यावेळी दिली.

जखमींच्या उपचाराचा खर्च कंपनी करेल - व्यवस्थापक

जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च कंपनीमार्फत चांगल्या रुग्णालयात करण्यात येईल. तसेच जखमींच्या घरच्यांना मदत देण्याच्या सूचना दिल्या असल्याचे भूगाव कंपनीच्या व्यवस्थापकांनी सांगितले.

loading image
go to top