esakal | VIDEO : ऐन तारुण्यात दृष्टी गेली, पण 'ते' आताही घडवताहेत राज्यस्तरीय खेळाडू
sakal

बोलून बातमी शोधा

blind coach trained state level player in rajura of chandrapur

बालपणापासून क्रीडा क्षेत्राची आवड असल्यामुळे मेहमूद शेख यांनी उच्च प्राथमिक शिक्षण घेत असताना राष्ट्रीयस्तरावर प्रतिनिधित्व केले. सुरुवातीचे शिक्षण बल्लारपूर येथील थापर हायस्कूल येथे घेतले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे इयत्ता सातवीनंतर स्पोर्टस अ‌ॅथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली.

VIDEO : ऐन तारुण्यात दृष्टी गेली, पण 'ते' आताही घडवताहेत राज्यस्तरीय खेळाडू

sakal_logo
By
आनंद चलाख

राजुरा (जि. चंद्रपूर ) :  बालपणापासून क्रीडाक्षेत्राची आवड. उच्च प्राथमिक शिक्षण घेत असतानाच राष्ट्रीयस्तरावर अ‌ॅथलेटिक्‍स स्पर्धेत मेडल प्राप्त केले. त्यानंतर पुढील पाच वर्ष मुंबई येथे स्पोर्टस अ‌ॅथॉरिटी ऑफ इंडियात निवड झाली. प्रशिक्षण झाले. या कालावधीत राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांत आपली चमक दाखविली. मात्र, तारुण्याच्या उंबरठ्यावर  दृष्टी दोषाने ग्रासले. अशाही परिस्थितीमध्ये नियतीला तोंड देत आपल्यातील कौशल्याचा वापर तरुणांसाठी झाला पाहिजे या ध्येयाने ते क्रीडा प्रशिक्षणाच्या माध्यमातून शेकडो खेळाडू घडवीत आहे. संकटावर मात करीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे श्री छत्रपती क्रीडा अकादमीचे मुख्य प्रशिक्षक मेहमूद जब्बार शेख उर्फ पाशा क्रीडाप्रेमींसाठी आदर्श ठरलेले आहेत.

हेही वाचा - कायदा कसा असावा हे पत्रात नमूद नव्हतेच, वाचा शरद पवारांच्या पत्राबद्दल काय म्हणाले...

बालपणापासून क्रीडा क्षेत्राची आवड असल्यामुळे मेहमूद शेख यांनी उच्च प्राथमिक शिक्षण घेत असताना राष्ट्रीयस्तरावर प्रतिनिधित्व केले. सुरुवातीचे शिक्षण बल्लारपूर येथील थापर हायस्कूल येथे घेतले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे इयत्ता सातवीनंतर स्पोर्टस अ‌ॅथॉरिटी ऑफ इंडिया मुंबई येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली. मुंबई येथील प्रशिक्षणादरम्यान अनेक राष्ट्रीय अ‌ॅथलेटिक्‍स स्पर्धेत मेडल प्राप्त केले. राष्ट्रीय अ‌ॅथलेटिक्‍स स्पर्धेत दीड हजार मीटरचे अंतर 3. 57 सेकंदात पार करून त्यांनी स्वतःमधील कौशल्य सिद्ध केले. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते. तारुण्याच्या उंबरठ्यावर त्यांना दृष्टी दोषाने  ग्रासले. त्यामुळे त्यांना परत बल्लारपूर येथे यावे लागले. नागपुरातील एका खासगी  रुग्णालयात त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रियाही झाली. मात्र, पुरेसा फायदा झाला नाही. शेवटी दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेल्याने जीवनात अंधकार पसरला. आयुष्यात पुढे काय करावे हे हे समजेनासे झाले. राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व केलेल्या तरुणांसमोर मोठे संकट उभे ठाकले. तरीही हार न मानता मेहमूद शेख उर्फ पाशा सर यांनी परत क्रीडाक्षेत्रात कामगिरी करायचे ठरविले. तरुणांना दिशा देण्यासाठी प्रशिक्षण देण्याचे काम त्यांनी सुरू केले. 

हेही वाचा - शेतकरी आंदोलनाची धग यवतमाळातही; 'बंद'च्या...

सुरुवातीला ते येथील शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर जायचे. तेथील ट्रॅकवर धावणाऱ्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करायचे. त्यावेळी विद्यार्थी त्यांच्यावर हसायचे. दृष्टिहीन व्यक्ती काय मार्गदर्शन करणार, अशी त्यांची अवहेलना करायचे. मात्र, त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले. विविध शाळांतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे ठरविले. यात भास्कर फरकाडे या शिक्षकांचे त्यांना सहकार्य मिळाले. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना अ‌ॅथलेटिक्‍सबद्दल मार्गदर्शन केले. त्यातील काही खेळाडूंनी राज्यस्तरावरील स्पर्धेत बाजी मारली. काही खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावरही अ‌ॅथलेटिक्‍समध्ये प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य मिळाले. मागील दहा वर्षांपासून सुरू  असलेल्या संघर्षाला एक वेगळे वळण मिळाले. पोलिस भरती, आर्मी, वन विभाग व इतर शासकीय नोकऱ्यामध्ये शारीरिक क्षमता सुदृढ ठेवण्यासाठी शेकडो विद्यार्थी मार्गदर्शक म्हणून पाशा सरांकडे येत आहे. सध्या शंभरावर विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनात वेगवेगळ्या स्पर्धांसाठी शारीरिक क्षमता सिद्ध करण्यासाठी मैदानावर परिश्रम घेत आहेत. मागील पाच वर्षांच्या कालखंडात त्यांच्या प्रशिक्षणातून तयार झालेले अनेक मुलं-मुली पोलिस, आर्मी, वनविभागात नोकरीवर रुजू झाले. 

हेही वाचा -

अद्यावत क्रीडांगणाची मागणी -
'तुम्ही मला अद्यावत क्रीडांगण द्या, मी तुम्हाला राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू घडवून देतो'. हे ब्रीद घेऊन मेहमूद जब्बार शेख क्रीडा क्षेत्रात वाटचाल करीत आहेत. तालुक्‍यातील युवकांना प्रेरणा देत आहेत. शासनाने तालुक्याच्या ठिकाणावर अद्यावत क्रीडांगण निर्माण करून द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.

loading image