
मुंबई बाजार समितीसह जिल्ह्यातील बाजार समिती संचालकांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी बंद पुकारला आहे. केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कृषी व पणन कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध सुरू आहे. मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
यवतमाळ : कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाची धग जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मंगळवार (ता. आठ) भारत बंदची हाक दिली आहे. राजकीय, सामाजिक, शेतकरी संघटनांचा सहभाग आंदोलनात राहणार आहे.
हेही वाचा - डॉ. शीतल आमटे मृत्यूप्रकरण : डावखुऱ्या नसतानाही उजव्या हाताला इंजेक्शन कसे टोचले?
मुंबई बाजार समितीसह जिल्ह्यातील बाजार समिती संचालकांनीही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी बंद पुकारला आहे. केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कृषी व पणन कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध सुरू आहे. मुबंई कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता राज्यातील इतर बाजार समित्यांनी सुद्धा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे राज्यभर बाजार समिती बंद राहणार आहे. सध्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. रब्बीच्या नियोजनासाठी शेतकरी शेतमाल विक्रीसाठी आणत आहे. शेतकऱ्यांना अडचण नये म्हणून याकाळात शेतकऱ्यांनी शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा - अमरावतीतील माधवनगर दरोड्याचा सुगावा लागेना; वर्धेत गेलेले पोलिस पथक परतले
केंद्र शासनाने आणलेले कृषी कायदा विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. यासाठी दिल्ली येथे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला मुबंई बाजार समितीने पाठिंबा दिला आहे. यानंतर जिल्ह्यातील संचालकांनीही शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
-प्रवीण देशमुख, संचालक, मुबंई कृषी उत्पन्न बाजार समिती.