डॉक्‍टरचे वेळकाढू धोरण! बाळाच्या गळ्याभोवती नाळ आल्याचे सांगून केले रेफर; मग घटला हा प्रकार

टीम ई सकाळ
Monday, 25 January 2021

आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने दीपिकाची आई गोंधळून गेली. गावातीलच काही नागरिकांनी त्यांना धीर दिला. यानंतर दीपिकाल एका वाहनातून खासगी रुग्णालयात दाखल केले.

कारंजा घाटगे (जि. वर्धा) : नाव दीपिका तांबे... दोन्ही डोळ्यांनी अंध... कुटुंबीयांनी तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर सुखी संसाराला सुरुवात झाली... अशात ती गर्भवती राहिली... घरी आनंदाचे वातावरण होते... छोटा बाळ जन्माला येणार याची कुटुंबीय वाट पाहत होते. अशात दीपिकाला प्रसूती वेदना सुरू झाल्या. प्रसूतीसाठी तिला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी उपचार करण्याचे सोडून दुसरीकडे रेफर करण्याच सल्ला दिला. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेला महिलेचा डॉक्‍टरांच्या वेळकाढू धोरणामुळे जीव गेला असता, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

दीपिका तांबे ही वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाटगे येथील रहिवासी आहे. ती अंध असून, नऊ महिण्यांनी गर्भवती होती. कुटुंबीय बाळाची वात पाहत असतानाच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. यामुळे कुटुंबीयांनी तिला येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले.

अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

यावेळी रात्रपाळीत कार्यरत असलेले डॉ. सचिन खोंड यांनी महिलेची तपासणी केली. यानंतर बाळाच्या गळ्याभोवती नाळ असल्याने बाळाच्या हृदयाचे ठोके वाढले आहे. त्यामुळे तिला नागपूरला घेऊन जा असे कुटुंबीयांना सांगून जबाबदारी झटकली.

आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने दीपिकाची आई गोंधळून गेली. गावातीलच काही नागरिकांनी त्यांना धीर दिला. यानंतर दीपिकाल एका वाहनातून खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे पोहोचताच अवघ्या दहा मिनिटांत दीपिकाची नॉर्मल प्रसूती झाली. दीपिकाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. डॉक्‍टरांच्या वेळकाढू धोरणामुळे या महिलेला जीव गमवावा लागला असता, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

जाणून घ्या - बापरे! वाळू तस्करांनी नायब तहसीलदारांच्या पोटावर चाकूने केले सपासप वार

डॉक्‍टरचे वेळकाढू धोरण

प्रसूतीसाठी आलेल्या अंध महिलेला वैद्यकीय अधिकाऱ्याने बाळाच्या गळ्याभोवती नाळ असल्याने बाळाच्या हृदयाचे ठोके वाढले आहे असे सांगून नागपूर येथे रवाना केले. यामुळे कुटुंबीय घाबरले. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलेला परिसरातील नागरिकांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. येथे तिची प्रसूती झाली. मात्र, डॉक्‍टरच्या वेळकाढू धोरणामुळे महिलेचा जीव धोक्यात आला होता.

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The blind woman doctor who came for delivery referred