रक्तदात्यांची साेशल मीडिया ‘ब्लड बँक’

प्रवीण खेते
सोमवार, 21 मे 2018

अकाेला : उन्हाळ्याचे दिवस, त्यात रक्तपेढ्यांतही ठणठणाट असताे. अशा वेळी आपल्यातीलच एखाद्याचे जीवन वाचविण्यासाठी रक्ताची गरज भासते. मात्र, वेळेवर रक्त मिळत नाही. या परिस्थितीत साेशल मीडियावरील रक्तदात्यांची ब्लड बँक शेकडाे रुग्णांना जीवनदान देणारी ठरत आहे. जिथे 24 बाय 7 रक्त उपलब्ध असते. गरज आहे, फक्त एका मॅसेजची.

अकाेला : उन्हाळ्याचे दिवस, त्यात रक्तपेढ्यांतही ठणठणाट असताे. अशा वेळी आपल्यातीलच एखाद्याचे जीवन वाचविण्यासाठी रक्ताची गरज भासते. मात्र, वेळेवर रक्त मिळत नाही. या परिस्थितीत साेशल मीडियावरील रक्तदात्यांची ब्लड बँक शेकडाे रुग्णांना जीवनदान देणारी ठरत आहे. जिथे 24 बाय 7 रक्त उपलब्ध असते. गरज आहे, फक्त एका मॅसेजची.

आपल्यातील एकाच्या रक्तदानाने अनेकांचा जीव वाचू शकताे. या सेवाभावी वृत्तीने अनेक तरुण माेठ्या उत्साहात रक्तदान करत असतात. पण, उन्हाळा म्हटला की, रक्तदानासाठी अनेकांची माघार असते. त्याचा परिणाम थेट रक्तपेढ्यांवर दिसून येताे. वेळेवर रक्त मिळत नाही, म्हणून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा जीव कासावीस हाेताे अन् याच संधीचा लाभ घेत दलालही सक्रीय हाेतात. मात्र, या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी समाजातील काही रक्तदात्यांनी व्हाॅट्सअॅप सारख्या प्रभावी साेशल मीडियाचा वापर रक्तपेढी म्हणून केला आहे. ज्या माध्यमातून नेहमीच गरजू रुग्णांसाठी रक्तदानाची अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येते.

रक्तदात्यांची साखळी
व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून रक्तदात्यांची एक साखळी निर्माण झाली आहे. सध्या ही साखळी दाेन ते तीन ग्रुप पुरताच मर्यादीत असली, तरी त्यामध्ये अकाेल्यासह परिसरातील जिल्ह्यातील रक्तदात्यांचा सहभाग आहे. त्यामुळे जवळपासच्या परिसरात कुठेही रक्ताची गरज भासल्यास एका मॅसेजवर त्याची पूर्तता केली जाते.

दलालांवर प्रभावी अंकुश
रक्तासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक हाेण्याच्या घटनांमध्ये वाढ हाेत आहे. परंतु, व्हॉट्सअॅपवरील या ब्लड बँकेमुळे अनेकांना थेट रक्तदाते मिळत असल्याने त्यांची हाेणारी फसवणूक टळत आहे.

येथे मिळते कौतुकाची थाप
ग्रुप मधील ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केलं. त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी शिवाय, इतरांना प्राेत्साहन मिळावे म्हणून रक्तदान करणाऱ्या सहकाऱ्याचे कौतुक केले जाते. यात जीव्हाळा मित्र ग्रुप, अकाेला जिल्हा रक्तपेढी, एकसाथ  अकाेला, रूग्ण सेवा, विपुर रक्त मित्र संघटन हे गट कार्यरत आहेत.

Web Title: blood bank on social media for blood donors