बेपत्ता असलेल्या तरुणांचं लोकेशन मिळालं नाल्याजवळ; जाऊन बघताच दिसलं थरकाप उडवणारं दृश्य   | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bodies of young men found below bridge in Bhandara district

मंगळवारी संध्याकाळी नागपूरवरून निघालेले युवक सकाळपर्यंत घरी आले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे मोबाईल बंद होते.

बेपत्ता असलेल्या तरुणांचं लोकेशन मिळालं नाल्याजवळ; जाऊन बघताच दिसलं थरकाप उडवणारं दृश्य  

तुमसर (जि. भंडारा) : तुमसर-बपेरा मार्गावरील खैरलांजी गावाजवळ भरधाव वेगातील दुचाकी अनियंत्रित झाल्याने पुलावरून खाली कोसळून दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, बुधवारी मृतांचे नातेवाईक शोध घेताना उघडकीस आली. मृतांची नावे संजय उर्फ समिर राकेश राऊत (वय 22) पिलीनदी नागपूर आणि संगीत हशिंद्र चौधरी (वय 20) रा. छतेरा जि. बालाघाट अशी आहेत.

हेही वाचा - यवतमाळ जिल्ह्यातील नेरची अनुष्का बदुकले ठरली महाराष्ट्राची बालकवी

मंगळवारी रात्री दोन युवक दुचाकीने (क्रमांक :एमएच 40/बीएस 6055) नागपूरवरून बालाघाट जिल्ह्याकडे जात होते. तुमसर-बपेरा मार्गावरील खैरलांजी गावाच्या नाल्यावरून जाताना रात्री भरधाव वेगातील दुचाकी अनियंत्रित झाली. त्यामुळे संतुलन बिघडून दुचाकीसह दोघेही पुलावरून नाल्यात कोसळले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.

मंगळवारी संध्याकाळी नागपूरवरून निघालेले युवक सकाळपर्यंत घरी आले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे मोबाईल बंद होते.

हेही वाचा - भांडणात महिलेनं घेतला चावा अन् तुटला अंगठा: नळाच्या पाण्यावरून दोन गटात घडला थरार 

मात्र, मोबाईल लोकेशन वरून दोन्ही तरुणांचे खैरलांजी गावाजवळ लोकेशन मिळाले. त्यावरून शोध घेतला असता नाल्याच्या पुलाखाली दोघांचे मृतदेह आणि दुचाकी मिळून आली. तुमसर पोलिसांनी घटनेची नोंद करून मृतदेह शवविछेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

टॅग्स :YavatmalTumsar