भांडणात महिलेनं घेतला चावा अन् तुटला अंगठा: नळाच्या पाण्यावरून दोन गटात घडला थरार 

विनोद कोपरकर 
Wednesday, 10 February 2021

एकता नगरमधील नगर पंचायतच्या नळावर उषा विश्वनाथ वाठोरे ही पाणी भरण्यास गेली असता त्या ठिकाणी आरोपी रेखा रोहिदास पांडे व तिची बहीण पूजा चौगुले ही पाणी भरण्यासाठी नळावर आल्या.

महागाव (जि. यवतमाळ) :  गेल्या काही दिवसांपासून शहरात अनेक प्रभागात पाणी टंचाई निर्माण झाली असून अनेकदा पाण्यासाठी किरकोळ भांडणाच्या घटना घडल्या आहेत. शहरातील प्रभाग क्र १० मध्ये नळावर पाणी भारताना मागील वाद काढत एका गटाने दुसऱ्या गटावर हल्ला केला. त्यात एका महिलेने चावा घेतल्याने अंगठा तुटला असून या घटनेची तक्रार दोन्ही गटांनी परस्परा विरुद्ध केल्याने विविध कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा - 'पीएचसी'ची चौकशी करायला गेले, पण घडलं भलतंच, जावून बघताच ग्रामस्थांना बसला धक्का

एकता नगरमधील नगर पंचायतच्या नळावर उषा विश्वनाथ वाठोरे ही पाणी भरण्यास गेली असता त्या ठिकाणी आरोपी रेखा रोहिदास पांडे व तिची बहीण पूजा चौगुले ही पाणी भरण्यासाठी नळावर आल्या. 

 त्यावेळी लहान बहीण पूजा त्या ठिकाणी गेली असता उषा वाठोरे ही वाद करून मारहाण मारहाण केली. त्यात चव घेतल्यामुळे बोट तुटले. भांडण सोडवण्यासाठी सतीश गेला असता त्याला आरोपींने रोड वरील विट उचलून मारले. त्यात तो जखमी झाला असून बहिणीला शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी दिली आहे. त्यावरून महागाव पोलिस ठाण्यात जबानी फिर्याद वरून आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

हेही वाचा - टिनाच्या शेडात पाच मुली, माय आणि आजी, चार महिन्यांपासून नाही अंघोळ 

आरोपी सतीश चौगुले, दीपक सुरोसे, यांनी गोट्याने मारहाण केली. आरोपी विरुद्ध भा.द.वी २९४, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह कलम ३(२)(VA अजाज) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी वालचंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक तपस ठाणेदार विलास चव्हाण हे करीत.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fight between two groups on the issue of tap water in Yavatmal