sakal

बोलून बातमी शोधा

The driver of the car collided with the traffic police

काश याने त्यांना जुमानले नाही आणि कार सुसाट पळवली. अमोल चिदमवर यांनी पुन्हा एकदा हटकले. यावेळी त्याने त्यांच्या अंगावरच कार चढवून चिरडण्याचा प्रयत्न केला. प्रसंगवधान राखत अमोल यांनी कारच्या बोनेटवर उडी घेतली.

नागपुरात दिवसा थरार : वाहतूक पोलिस कर्मचारी बोनेटवर आणि कार सुसाट

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : वाहतूक पोलिसांच्या विशेष अभियानादरम्यान पोलिस कर्मचाऱ्याने कारला थांबण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारचालकाने कार न थांबवता पोलिसाच्या अंगावर घातली. यात पोलिस कर्मचारी बोनेटवर पडला. पोलिसाला कारचालकाने जवळपास एक किमी फरफटत नेले. ही घटना सक्करदरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल चिदमवर असे वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते २९ नोव्हेंबर रोजी ते सक्करदरा चौकात कार्यरत होते. कर्तव्यावर असताना अमोल चिदमवर यांनी आकाशला कार थांबवण्याचा इशारा केला.

जाणून घ्या - वाघाचा मागोवा घेण्यासाठी वनविभागाचे पथक जंगलात घालत होते गस्त; समोरचे दृष्य पाहताच बसला धक्का

मात्र, आकाश याने त्यांना जुमानले नाही आणि कार सुसाट पळवली. अमोल चिदमवर यांनी पुन्हा एकदा हटकले. यावेळी त्याने त्यांच्या अंगावरच कार चढवून चिरडण्याचा प्रयत्न केला. प्रसंगवधान राखत अमोल यांनी कारच्या बोनेटवर उडी घेतली.

यानंतरही आकाशने कार न थांबविता वाहतूक पोलिसाला पाचशे मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. ताजबाग चौकात वाहतूक कोंडी झाल्यामुळे आकाशला कार थांबवावी लागली. त्यानंतर आकाशला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याविरोधात सक्करदरा पोलिस ठाण्यामध्ये पोलिस कर्मचाऱ्याला ठार मारण्याच्या प्रयत्नाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हेगारीच्या घटनांनी काढले डोके वर

देशाची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटनांनी डोके वर काढले आहे. आता एका गुंडाच्या साथीदाराने वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले. याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.

हेही वाचा - बाबा आमटेंच्या आनंदवनमधील वादाला कुठून झाली सुरुवात, नेमके काय आहे प्रकरण? 

सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल

या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. कारचालक आकाश हा एका गुंडाचा साथीदार आहे. कारला पूर्णपणे काळ्या काचा लावण्यात होत्या. कार चालकाने चौकात दोन दुचाकींनाही धडक दिली. यात एक महिला किरकोळ जखमी झाली आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

go to top