esakal | कामानिमित्त घराबाहेर पडला आणि बेपत्ता झाला; मात्र, दुचाकी फिरताना दिसल्याने समोर आले हे सत्य
sakal

बोलून बातमी शोधा

The body of a missing person was found

समुद्रपूर तालुक्‍यात गस्तीवर असलेल्या पोलिसांना सदर दुचाकी चालविताना दोन युवक आढळून आले. या युवकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर वरोरा पोलिसांच्या स्वाधीन केले.

कामानिमित्त घराबाहेर पडला आणि बेपत्ता झाला; मात्र, दुचाकी फिरताना दिसल्याने समोर आले हे सत्य

sakal_logo
By
साईनाथ सोनटक्के

खांबाडा (जि. चंद्रपूर) : कामानिमित्त बाहेर गेलेला व्यक्ती घरी आलाच नाही. कुटुंबीयांनी शोधाशोध करून पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून तपासाची चक्रे फिरवित अन्य पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यानुसार सदर व्यक्तीची दुचाकी चालविताना समुद्रपूर येथील दोन युवकांना ताब्यात घेतले. दोघांना वरोरा पोलिसांच्या स्वाधीन केले. तपासात या दोघांनी सदर व्यक्तीचा खून करून जिनिंगजवळ मृतदेह टाकल्याची कबुली दिली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. विष्णू बालाजी कष्टी (वय ३६) असे मृत्ताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरोरा तालुक्‍यातील खांबाडा येथील विष्णू कष्टी हे दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त आपल्या मालकीच्या वाहनाने घराबाहेर पडले. मात्र, रात्र होऊनही ते घरी परतले नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोधाशोध करून वरोरा पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपासचक्रे फिरवित अन्य पोलिस ठाण्याला वर्णन आणि वाहनाची माहिती दिली.

क्लिक करा - मित्राचे काकूशी अनैतिक संबंध; रंगेहात पकडल्याने केला खून

समुद्रपूर तालुक्‍यात गस्तीवर असलेल्या पोलिसांना सदर दुचाकी चालविताना दोन युवक आढळून आले. या युवकांना ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यानंतर वरोरा पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता खून केल्याची कबुली देत खांबाडा येथील जिनिंगजवळ मृतदेह टाकल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. चेहरा विद्रूप करण्यात आला असून, पोटावर गंभीर जखमा आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

संपादन - नीलेश डाखोरे