बेपत्ता महिलेचा मृतदेह आढळला विहिरीत!

प्रशिक मकेश्वर
Wednesday, 16 September 2020

कल्पना मनोहरराव कळबे वय ५५ असे मृत महिलेचे नाव आहे. दोन दिवसांआधी घरच्या शेतात निंदन करण्याकरिता गेलेल्या कल्पना कळबे या घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी शोध घेण्यास सुरवात केली मात्र त्या कुठेही सापडल्या नाहीत.

तिवसा (अमरावती) तालुक्यातील उंबरखेड येथे दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह आज दुपारी २ वाजताच्या सुमारास त्यांच्याच शेतातील विहिरीत आढळून आल्याने गावात चांगलीच खळबळ उडाली आहे

कल्पना मनोहरराव कळबे वय ५५ असे मृत महिलेचे नाव आहे. दोन दिवसांआधी घरच्या शेतात निंदन करण्याकरिता गेलेल्या कल्पना कळबे या घरी परत न आल्याने घरच्या लोकांनी शोध घेण्यास सुरवात केली मात्र त्या कुठेही सापडल्या नाहीत. आज दुपारी काही महिला शेतातील विहिरी जवळ गेल्या असता त्यांना पाण्यावर मृतदेह तरंगताना दिसून आला. या घटनेची माहिती गावात पसरताच गावातील लोकांनी शेतात गर्दी केली. या घटनेची माहिती तिवसा पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनाकरिता तिवसा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

सविस्तर वाचा - आहे की नाही गंमत! पोलिसांना पाहून चक्क नदीत मारल्या उड्या

मात्र दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या महिले संदर्भात तिवसा पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार का करण्यात आली नाही? असा प्रश्न उपस्थत केला जात आहे. बेपत्ता महिलेचा मृतदेह तिच्याच शेतात आढळून आल्याने ही हत्या की आत्महत्या? अशी शंका निर्माण केली जात आहे. पुढील तपास तिवसा पोलिस करीत आहेत.

 

संपादन - स्वाती हुद्दार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The body of the missing woman was found in well

Tags
टॉपिकस
Topic Tags: