esakal | शेतकऱ्याचा खून; मृतदेह आढळला अर्धवट जळालेल्या अवस्थेत
sakal

बोलून बातमी शोधा

balapur.jpg

या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून शिवनाथ गोरखनाथ भोईटे असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरुपाच्या जखमा आढळून आल्या आहेत.

शेतकऱ्याचा खून; मृतदेह आढळला अर्धवट जळालेल्या अवस्थेत

sakal_logo
By
अनिल दंदी

बाळापूर (जि.अकोला) : उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोरगाव भाकरे शेतशिवारात हरभऱ्याच्या शेताला राखण असलेल्या एका 54 वर्षीय शेतकऱ्याचा खून झाल्याची घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली. 

या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असून शिवनाथ गोरखनाथ भोईटे असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरुपाच्या जखमा आढळून आल्या आहेत. तर अर्धवट जळालेल्या अवस्थेत असलेला हा मृतदेह शेतातील पीक राखनीसाठी बांधलेल्या मचाणावर आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रोहिनी सोळंके व उरळ पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. ठसे तज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले.

महत्त्वाची बातमी - पानटपरीवाल्याने चक्क अन्न व औषध प्रशासन मंत्र्यालाचा दिला ‘गुटखा’

डोक्यावर व पायावर अवजाराने मारहाण
अकोला तालुक्यातील मात्र उरळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मोरगाव भाकरे येथील शिवनाथ भोईटे या मृत शेतकऱ्याचे बाखराबाद-भौरद रस्त्यावर शेती आहे. या शेतकऱ्याचे सर्वच कुटुंब शेतात राबते. शेतात गहू व हरभऱ्याचे पीक असल्याने मृतक हा रात्रंदिवस राखणीला असतो. नेहमीप्रमाणे तो काल शनिवारी रात्री राखणीला असताना अज्ञात मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यावर व पायावर कुठल्यातरी अवजाराने मारहाण केली. यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

क्लिक करा - धक्कादायक : एका भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघा भावांचा मृत्यू

मचाणावर ठेऊन मारेकरी पसार
घटनास्थळा जवळच काही लाकडे पेटलेली होती. त्यामुळे मृतक हा पेटलेल्या लाकडांवर पडल्याने तो भाजला गेला. त्यानंतर मारेकऱ्यांनी त्याला वर मचाणावर ठेऊन मारेकरी पसार झाले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. आज सकाळी मृताची पत्नी लता भोईटे शेतात हरभरा सोंगणीसाठी आल्याने ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयात रवाना केला.

loading image