esakal | धक्कादायक : एका भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघा भावांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

electric shock.jpg

धक्क्यात मात्र दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली.

धक्कादायक : एका भावाला वाचविण्याच्या प्रयत्नात दोघा भावांचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देगाव (जि.अकोला) : शेतामधील हरभरा, गहू पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला विजेचा धक्का लागला. आरडा-ओरड केल्याने, त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात भाऊ आणि काकाचा मुलाला विजेचा धक्का लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना वाडेगाव शिवारात रविवारी (ता.16) सकाळी नऊ वाजता घडली. त्यामुळे परिसरात शोकाकळा पसरली आहे.

महत्त्वाची बातमी - पानटपरीवाल्याने चक्क अन्न व औषध प्रशासन मंत्र्यालाचा दिला ‘गुटखा’

नेहमी प्रमाणे शेतामध्ये हरभरा आणि गहू पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या आरिफ खानने मोटरपंप चालू केले. परंतु, तेवढ्यात त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. त्यामुळे त्याने जोरात आराडा-ओरड करून जवळच असलेल्या भावाला आवाज देण्याचा प्रयत्न केला. त्याचा आवाज ऐकताच भाऊ शेख आसीफ शेख शब्बीर (वय 32) आणि त्यांचा काकाचा मुलगा शेख महेमुद शेख राशीद (वय 45) हे धावतच घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी दोघानींही आरीफला वाचविण्याचे प्रयत्न केले. त्यांचे प्रयत्न यशस्वीही झाले. 

क्लिक करा - क्षुल्लक कारणावरून राडा; पोलिसांसोबत बाचाबाची

जागेवरच झाला मृत्यू
याचवेळी या दोघांना विजेचा जोरदार धक्का लागला. या धक्क्यात मात्र दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. विजेच्या धक्क्यात गंभीर जखमी असलेल्या आरीफला उपचारासाठी अकोला येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचप्रमाणे घटनेत मृत्यू झालेल्या दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय महाविद्यालयात पाठवण्यात आले असून, पुढील तपास बाळापूर पोलिस करीत आहेत.

loading image