

High Court Relief for Farmers Over Crop Damage
Esakal
वन्यजीव संरक्षण कायद्यातील 'वन्य प्राणी' या संज्ञेत पोपटांसारख्या पक्ष्यांचाही समावेश होतो. परंतु, संबंधित शासन निर्णयात (जीआर) पोपट पक्षाचा उल्लेख नाही, या कारणावरून एखाद्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवता येणार नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. केवळ काही विशिष्ट प्रजातींमुळे झालेल्या नुकसानीवरच भरपाई देणे तर्कसंगत नाही, असे नमुद करताना न्यायालयाने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.