
वर्धा : नागपूर जिल्ह्यातील बोरी पोलिस स्टेशन अंतर्गत देशी दारू दुकानदाराला बंदुकीचा धाक दाखवून लुटले. तेथून पळ काढलेल्या आरोपींची माहिती मिळताच वर्धा पोलिसांनी चौघांना सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई वर्धा येथील मस्जिद चौकात शनिवार (ता. दोन) सायंकाळच्या सुमारास केली. अटकेचा संपूर्ण थरार सीसीटीव्हीत कैद झाला. या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली असून एक जण फरार झाला आहे.