esakal | आता याला काय म्हणावं! बाल निरीक्षण गृहातून पळालेल्या अल्पवयीन मुलाचा प्रताप बघून पोलिसही चक्रावले 
sakal

बोलून बातमी शोधा

boy ran away from Child Care Home and did crime in chandrapur

येथील फुकटनगरात एक सराईत गुन्हेगार आहे. 17 वर्षे वयाचा हा बाल गुन्हेगार चोरी, घरफोडी करण्यात मोठा तरबेज आहे. रामनगर, शहर पोलिस ठाणे हद्दीत अनेक ठिकाणी घरफोडी, चोरी केल्या.

आता याला काय म्हणावं! बाल निरीक्षण गृहातून पळालेल्या अल्पवयीन मुलाचा प्रताप बघून पोलिसही चक्रावले 

sakal_logo
By
टीम ई सकाळ

चंद्रपूर : शिकण्याच्या वयात चोरी, घरफोडीचा मार्ग पकडला. एका मागून एक गुन्हे घडत गेले. एका गुन्ह्यात पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी अल्पवयीन असल्याने बाल निरीक्षण गृहात रवानगी केली. चार भिंतीत मन बेचैन झाले. अखेर, येथून बाहेर पडण्याची युक्ती लढविली. संधी मिळताच तेथून पळ काढला. लगेच दुसऱ्या दिवशी घरफोडी केली. रामनगर पोलिस ठाण्यातील डीबी पथकाने पुन्हा ताब्यात घेतले. चौकशीअंती रामनगर, शहर पोलिस ठाणे हद्दीत त्याच्यावर यापूर्वीच तब्बल दहा गुन्हे असल्याचे उघड झाले. ही कहाणी आहे फुकटनगरातील निवासी सराईत गुन्हेगाराची.

येथील फुकटनगरात एक सराईत गुन्हेगार आहे. 17 वर्षे वयाचा हा बाल गुन्हेगार चोरी, घरफोडी करण्यात मोठा तरबेज आहे. रामनगर, शहर पोलिस ठाणे हद्दीत अनेक ठिकाणी घरफोडी, चोरी केल्या. त्याच्यावर तब्बल दहा गुन्हे दाखल आहेत. तीन महिन्यांपूर्वी एका चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली. गुन्हा दाखल करून अल्पवयीन असल्याने बाल निरीक्षण गृहात रवानगी केली. मागील तीन महिन्यांपासून तो या गृहात होता. मात्र, तेथे त्याची दमछाक होत होती. त्यामुळे त्याने बाल निरीक्षण गृहातून पळून जाण्याची योजना आखली. संधी साधून तीन दिवसांपूर्वी त्याने तेथून पळ काढला.

ब्रेकिंग: समुद्रपूर तालुक्यात भीषण अपघाताच्या दोन घटना; ऐन होळीच्या दिवशी तीन जण ठार 

बाल निरीक्षण गृहातून पळ काढल्यानंतर अनेक ठिकाणी चोरी, घरफोडीचा सपाटा लावला. मागील तीन दिवसांत त्याने तब्बल लाखाहून अधिकचा मुद्देमाल लंपास केला. अल्पवयीन बालक सराईत गुन्हेगार असून, त्याने नुकत्याच केलेल्या घरफोडी, चोरीतील मुद्देमाल घरी लपवून ठेवल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. 

कोरोनामुळे यंदाही होळीचा रंग बेरंग; कोट्यवधींचे व्यवहार ठप्प; प्रशासनाचे कडक निर्बंध

यावेळी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्याने चोरी, घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली केली. यावेळी त्याच्याकडून सोने, चांदीचे दागिने व मोबाईल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अल्पवयीन बालकाची गुन्हेगारी बघून पोलिसही चक्रावले. अवघ्या 17 वर्षांत त्याने केलेले चोरी, घरफोडीच्या गुन्हे गंभीर आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुन्हा त्याची बाल निरीक्षण गृहात रवानगी केली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image