मैत्रिणीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न, मारहाणही केली, काय आहे प्रकरण...वाचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहित छायाचित्र

जिल्ह्यातील धामणगावरेल्वे तालुक्‍यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला जबर मारहाण झाली. दत्तापूर पोलिसांनी याप्रकरणी युवकास अटक केली.

मैत्रिणीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न, मारहाणही केली, काय आहे प्रकरण...वाचा

अमरावती : जिल्ह्यातील धामणगावरेल्वे तालुक्‍यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिला जबर मारहाण झाली. दत्तापूर पोलिसांनी याप्रकरणी युवकास अटक केली असून, न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सलमान खान सलीम खान (वय २०), असे पोलिस कोठडीत असलेल्या संशयित आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. १६ वर्षीय पीडित अल्पवयीन युवतीची दोन वर्षांपासून सलमान सोबत ओळख होती. त्याने किरकोळ कारणासाठी तिला बाहेर बोलावून अनेकदा अत्याचार केला. पीडितेने नकार दिला असता, बरेचदा ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. शिवाय मारहाण करून दबावसुद्धा टाकला. पीडित युवतीने सलमानचा त्रास वाढत असल्याचे बघून दत्तापूर ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी चौकशीअंती गुन्हा दाखल केला.

वाचा - कोरोना कुणालाही होऊ शकतो. परंतु मृत्यूच होतो हे मनातून काढून टाका...

शनिवारी त्याला न्यायालयासमोरही हजर केले होते. दरम्यान, एका अन्य घटनेत अमरावतीच्या नागपुरीगेट ठाण्याच्या हद्दीत एका २४ वर्षीय महिलेच्या घरात घुसून संशयित आरोपी शेख मोनू वल्द अन्वर (वय २२) या युवकाने बळजबरीने अत्याचार केला. पीडितेच्या तक्रारीवरून नागपुरीगेट ठाण्यात शेख मोनूविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला.

संपादन - नरेश शेळके

Web Title: Boy Try Blackmail Friends Also Beat Her

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Amravati
go to top