काही दिवसांचा पाठलाग, नंतर केला हा प्रयत्न 

file photo
file photo

यवतमाळ : शाळा व महविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनी असुरक्षित असल्याच्या घटना अनेकदा पुढे येत असतात. त्यामुळे विद्यार्थिनींसह पालकांनी देखील सतर्क राहण्याची गरज आहे. अशीच एक घटना यवतमाळमध्ये घडली. काही दिवस पाठलाग केल्यानंतर सडकछाप मजनूंनी एक प्रयत्न केला. मात्र, सतर्क असलेल्या विद्यार्थिनीमुळे त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला. 

महाविद्यालयीन विद्यार्थिनीला जबरदस्तीने कारमध्ये बसवून नेण्याचा प्रयत्न होताच आरडाओरड केली. नागरिकांनी तत्काळ धाव घेतल्याने विद्यार्थिनीला पळविण्याचा डाव फसला. ही घटना मंगळवारी (ता.24) दुपारी चार वाजतादरम्यान आयुर्वेदिक रुग्णालयासमोर घडली. 

एक विद्यार्थिनी शहरातील महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तरुण काही दिवसापासून तिचा पाठलाग करीत होता. दरम्यान मजनू आज चक्क कार घेऊन आला. विद्यार्थिनीला कारमध्ये जबरदस्तीने कारमध्ये बसविण्याचा प्रयत्न केला. मुलीने समयसुचकता दाखवत आरडाओरड केली. लगेच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे पळून जाण्याचा बेत फसला. 


विद्यार्थिनीला पळविण्याचा डाव उधळला 
नागरिकांनी तरुणाला बाहेर येण्यास सांगितले. काही मिनिटे तरुण बाहेर आला नाही. संधी साधून तरुणाने पळ काढला. मात्र, नागरिकांनी पाठलाग करून मजनुला पकडले आणि चोप दिला. काही नागरिकांनी अधिक चोप देण्यास विरोध करीत त्याला अवधूतवाडी पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी विद्यार्थिनीने तक्रार देण्यासाठी पोलिस ठाणे गाठले होते. वृत्तलिहेस्तोवर कोणताही गुन्हा नोंद झाला नव्हता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com