

Amravati
esakal
ब्रह्मपुरी: मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा पाण्याचा अंदाज न आल्याने नाल्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. २) शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चांदगाव रोड जवळील (नाला) डोंगे घाट येथे सकाळच्या सुमारास घडली. नैतिक अशोक शेंडे (वय १६, रा. ब्रह्मपुरी) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, तो ख्रिस्तानंद स्कूलचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी होता.