सात पिढ्यांच्या परंपरेत पडला खंड; वाचा काय झाले असे?

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

अष्टमी शिव-पार्वतीचा विवाह सोहळा पार पाडतात. शिवलींगावर फेटा व झांपर अशा प्रकारची नवस ठेवून मंगलाष्टके म्हटल्या जातात.

डोंगरकिन्ही (जि.वाशीम) : ‘बम्म बम्म भोले’ जयघोषात महादेवांच्या तीर्थक्षेत्रावर पारंपरिकपणे साजऱ्या होणाऱ्या आमली बाराचासुद्धा कोरोनामुळे विरस होण्याचे चित्र दिसत आहे. किन्हीराजा येथील नारायणराव घुगेंची सिंदखेड पासुन तर शिखर शिंगणापूर पर्यंत महादेवाची काठी नेण्याची सात पिढ्‌यांची परंपरा कोरोनाच्या महामारीमुळे प्रथमच खंडित होणार आहे. आमली बारस रविवारी (ता.5) रोजी आहे.

देवात देव महादेव भाविकांत मानल्या जातो. त्यामध्ये आमली बारस महोत्सवाला विशेष महत्व आहे. बाराही दिवस धार्मीक अध्यात्मीक कार्यक्रमाची रेलचेल असते. अष्टमी शिव-पार्वतीचा विवाह सोहळा पार पाडतात. शिवलींगावर फेटा व झांपर अशा प्रकारची नवस ठेवून मंगलाष्टके म्हटल्या जातात. तसेस बाराही महीने घरासमोर नवसांनी गुंडाळलेली ऊंचच ऊंच काठी असते या काठीची रोजच मनोभावे पूजा केली जाते. आणि ही काठी महादेवांच्या मंदिरावर नेतात. यामध्ये विशेषतः अकोला जिल्ह्यातील सिंदखेडाच्या सिद्धेश्वर संस्थांवर या भागातूनभावीक मंडळी महादेवाची काठी सजवून पायदळ वारी करीत नेत असतात.

हेही वाचा - मी दिसताच मुलगी रडते, पण तरीही तिला जवळ घेता येत नाही

ह्यामध्ये किन्हीराजा येथील भावीकभक्त नारायणराव घुगे यांच्या घराण्यात सात पिढ्यांची महादेवांच्या काठीची परंपरा आहे. वामनरावांनी त्यांच्या वाडवडीलांपासुन चालत आलेली काठीची परंपरा चालविली पुढे नारायणरावचे खापरपजोंबा संभाजीराव, पणजोबा गंगाजीराव आजोबा भवानराव वडील महादेवराव यांनी अखंडितपणे चालविली सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर पर्यंत आमली बारसला महादेवाची काठी त्यांचे वाडवडील नेत ही परंपरा नारायणराव घुगे यांनी अखंडित ठेवली आणि ते अकोला जिल्ह्यातील सिंदखेडा येथील सिद्धेश्वर संस्थांवर शंभराचे जवळपास भाविक भक्तांसह किन्हीराजावरुन पायदळ वारीने महादेवांची काठी नेत असत तेथे हजारो शिवभक्त आपल्या काठ्या आणतात. 

शिवलिंगाची पूजा करतात. शिवालयाला काठीसह पाच प्रदक्षिणा घालतात. बमबमभोलेचा गजर , करतात. आणि काठी मिरवीतात. रोठचा स्वयंपाक करतात. आणि ही आमली बारस रविवारी शनिवारी (ता. 5) आहे. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे या आमली बारसला आम्ही काठी नेणार नसल्याचे आणि सात पिढ्‌यांच्या इतिहासात प्रथमच महादेवाद्वारी काठी नेण्याची परंपरा खंडित होणार असल्याचे नारायणराव घुगे यांनी सांगितले. तसेच पौराणिक आख्यायिका असलेल्या चांडसचे चंद्रेश्वर संस्थान असो, पुरातन तपोवन संस्थान असो, सुदी येथील पंचमुखी महादेवाचे संस्थान असो, शे-सव्वाशे घरांचे चिमुकल्या वाकापुरातील वाकेश्वर संस्थान पासून तर अकोला जिल्हातील महान धरणालगत कोथळीचे सिद्धेश्वर संस्थान असो, निसर्गरम्य तामकराडा असो या सारख्या कित्येक संस्थानवर आमली बारसला हा उत्सव साजरा होतो.

आमली बारस आज
आमली बारस रविवारी (ता. 5) आहे. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे या आमली बारसला आम्ही काठी नेणार नाही. त्यामुळे सात पिढ्यांच्या इतिहासात प्रथमच महादेवाद्वारी काठी नेण्याची परंपरा खंडित होणार आहे.
- नारायणराव घुगे, भाविक, डोंगरकिन्ही (ता. मालेगाव)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: breakthrough in the seven generations