वर बोहल्यावर चढण्याच्या होता प्रतीक्षेत अन् वधू देत होती ऑनलाईन परीक्षा; वऱ्हाडींनी दिलं शिक्षणाला महत्त्व

bride giving paper instead of wedding in yavatmal district marathi news
bride giving paper instead of wedding in yavatmal district marathi news

दिग्रस (जि. यवतमाळ) : लग्नाचा मुहूर्त दुपारी 12 वाजता ठरलेला असताना वऱ्हाडी उशिरा पोहोचले. आधी मंगलाष्टके की, नवऱ्या मुलीचा ऑनलाइन पेपर, यावर वधूसह नातेवाईक विवंचनेत सापडले. पण यावेळी नाववधूने शिक्षणाला महत्व देत हा प्रश्न सोडवला. नवरदेव बोहल्यावर चढण्याच्या प्रतीक्षेत असताना आधी पेपर सोडवायचा आणि नंतर विवाह सोहळा पार पाडायचा, असा निरोप पाठविला.

नवरदेवाकडील मंडळींनीही तत्काळ होकार दिला. मग काय मेहंदी लागलेल्या हाताने नवऱ्या मुलीने आधी ऑनलाइन पेपर सोडवला. त्यानंतर दोघेही बोहल्यावर चढले आणि मंगलाष्टकांचा सूर वऱ्हाडींच्या कानावर पडला.

दिग्रस येथील सारिका अरुण शिखरे हिचा विवाह अमरावती येथील नीलेश साबळेसोबत गुरुवारी (ता.24) दुपारी 12 वाजता आयोजित करण्यात आला होता. विवाहाचा मुहूर्त टळून गेल्यावर अमरावतीवरून वऱ्हाडी दुपारी दीडच्या दरम्यान पोहोचले. 

नवरदेव तयारी करून मारोतीच्या पारावर पोहोचला व दर्शन घेऊन लग्नमंडपात आला. लग्नाला आधीच दोन तास उशीर झाला. त्यामुळे पाहुणे मंडळीला मंगलाष्टकांची प्रतीक्षा होती. पेपरची वार्ता मंडपात पोहोचली. सर्वांनीच पेपर होईपर्यंत थांबणे पसंत केले. नवरीने आनंदाने आपल्या वर्गमैत्रिणींसोबत ऑनलाइन पेपर सोडविला, नंतरच ती बोहल्यावर चढली. दोन्हीकडील मंडळींनी शिक्षणाला दिलेले महत्त्व बघता कौतुक होत आहे.

क्षणाचाही विलंब नाही

सारीकाचा बीएस्सी ऍग्रो सहकार विषयाचा ऑनलाइन पेपर दुपारी दोन ते 2.40 वाजेपर्यंत असल्याचा निरोप पाठविण्यात आला. आधी पेपर सोडवू, नंतर विवाह सोहळा पार पाडू, असा निरोप देण्यात आला. क्षणाचाही विलंब न करता नवरदेवासह नातेवाइकांनी पेपर सोडविण्याला संमती दिली. सारीकाने पेपर सोडविला. त्यानंतर ती बोहल्यावर चढली. 

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com