
वर्धा : पुलगाव येथून अमरावतीकडे जाणाऱ्या जुन्या मार्गावरील वर्धा नदीवरील पूल जीर्ण झाल्याने या पुलावरून सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर पुलावरून वाहतूक बंद केली होती. त्यामुळे या पुलावरून पलीकडे जाणाऱ्या लोकांना जवळपास चार ते पाच किलोमीटरचा फेरा मारून पलीकडे जावे लागत आहे. खासदार अमर काळे हे पुलगावच्या दौऱ्यावर असतांना तेथील विद्यार्थी,महिलासह नागरिकांनी खासदारांना घेराव घालत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा असा आग्रह धरला.