'रासलीले'चा डाव रंगात येण्यापूर्वीच उधळला

Brothel at yavatmal
Brothel at yavatmal

यवतमाळ : शहरातील पॉश वस्तीत सुरू असलेले कुंटणखाने गेल्या काही महिन्यांपासून कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आले आहेत. गुरुवारी (ता.27) रात्री दहा वाजता जांब रोडवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामुळे "रासलीले'चा डाव रंगात येण्यापूर्वीच उधळला गेला. मात्र, येथील नागरिकांना या घरात किळसवाणे प्रकार सुरू होते, हेच माहिती नव्हते. आपल्या घराच्या आजूबाजूला कुंटणखाना सुरू तर नाही ना? यासाठी आता प्रत्येकाने सजग होणे गरजेचे आहे. 

जांब रोडवरील एक घर भाड्याने दिले असून, घरात रात्रीच्या वेळीस देहविक्रीसाठी तरुणी उपलब्ध होत असल्याची टीप पोलिसांना मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून यवतमाळच्या उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर, अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे ठाणेदार आनंद वागतकर ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिस आल्याचे बघून तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला तर त्या घराच्या बाहेर तरुणी आढळून आली. पोलिसांनी त्या दोन तरुणांना पकडले. 

त्यात एका नगरसेवकाच्या भावाचा समावेश असल्याने खळबळ उडाली. आपल्याला यातील काहीच माहीत नाही, आपण केवळ मद्य रिचविण्यासाठी आलो, असे त्याने पोलिसांनी सांगितले. सदर घर कुणाचे आहे, याबाबत पोलिसांनी नागरिकांना विचारणा केली. मात्र, मालक कोण? हे माहित नाही, घर भाड्याने दिले आहे. इतकेच उत्तर स्थानिक रहिवासी देऊ शकले. 

या ठिकाणी सुरू असलेल्या किळसवान्या प्रकाराबद्दल नागरिकांना धक्काच बसला. काही वेळात पोलिस तिघांनाही अवधूतवाडी पोलिस ठाण्यात घेऊन गेले. रात्रीतून या प्रकरणात राजकीय घडामोडींनी वेग घेतला. रासलीलेपूर्वीच डाव उधळला गेल्याने पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी ठाणेदार आनंद वागतकर यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

कुलूप तोडण्यात चोरटेच सरस

कुलूप उघडण्यापूर्वीच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे काहींनी पळ काढला. आतमध्ये नेमके काय आहे, हे बघण्यासाठी पोलिसांनी कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. हा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी त्या घराजवळ एकच गर्दी केली. कुलूप तोडण्यात चोरटेच सरस ठरत असल्याची चर्चा रंगली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com