गोरेगाव बीएसएनएल कार्यालय तांत्रिकाच्या भरवश्यावर

bsnl
bsnl
Updated on: 

गोरेगाव (गोंदिया) : येथील बिएसएनएल कार्यालयात प्रभारी कनिष्ठ अभियंता निकेश कनोजे गोरेगाव कार्यालयात महिन्यातुन एकदाच येत असल्याने तांत्रिक दिलीपकुमार पारधी व मजुरांच्या भरवश्यावर मुख्य कार्यालय व उपशाखा चोपा, बबई, सोनी व मोबाईल टॉवर मुंडीपार, पालेवाडा, बबई, सोनी, तुमखेडा, कवलेवाडाची देखरेख करावी लागत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या बिएसएनएल विभागाद्वारे 150 लँडलाईन टेलीफोन, 75 नेटब्रॉड गेज, 5 लिंक लाईन यात महाराष्ट बँक, रजिस्टर कार्यालय, को-ऑपरेटीव्ह बँक, भंडारा को-ऑपरेटीव्ह बँक, सेतु विभागाचे कामे या विभागाव्दारे चालतात. त्याकरीता 1 कनिष्ठ अभियंता निकेश कनोजे यांना प्रभार देण्यात आले व तांत्रीक कामे पाहण्यासाठी दिलीपकुमार पारधी, चौकीदार, कुऱ्हाडी येथे 1 तांत्रिकाची नियुक्ती केली गेली आहे. 

परंतु कनिष्ठ अभियंता निकेश कनोजे हे कार्यालयात महिन्याकाठी एकदाच येत असल्याने ग्राहाकांना त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील बिएसएनएल सेवा 10 दिवसापासुन बंद पडली होती, यामुळे बँका, सेतु, कार्यालयात सेवा विस्कळीत होती. तांत्रिक कर्मचारी यांनी (ता. 20) ला दुरुस्ती केल्याने पुन्हा कार्यालय, बँक, सेतु चे कामे सुरु झाल्याची माहिती तांत्रिक कर्मचारी पारधी यांनी दिली. बँकेत, सेतु या महत्वाच्या ठिकाणी लिंक नसल्यास ग्राहक, नागरिक, विद्यार्थ्यांना यांचा फटका बसतो. यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी नियमित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Open drains and stagnant wastewater raise sanitation concerns at Gadchiroli District General Hospital.
Gurudev Seva Mandal Clarification
Devotees gather at Gurukunj Mozari during the 58th death anniversary event of Rashtrasant Tukdoji Maharaj.
Sant Tukdoji Maharaj