
उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पण केवळ अपघाताची कलमे लावण्यात आली. याप्रकरणी अपहरण, बलात्कार, हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण पोलिस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत.
गोंदिया ः बसपाचे माजी जिल्हाध्यक्ष दुर्वास भोयर यांची मुलगी जखमी अवस्थेत आढळली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिचे अपहरण केल्यानंतर बलात्कार आणि नंतर खून करण्यात आल्याचा आरोप भोयर दाम्पत्याचा आहे. याप्रकरणी पोलिस प्रकरण दाबत असल्याचा आरोप करीत या दाम्पत्याने आज पोलिसांच्या वाहनासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा - भाजपचे अनेक नेते महाविकास आघाडीच्या संपर्कात, गृहमंत्र्यांचा गौप्यस्फोट
भोयर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची १४ वर्षीय मुलगी १२ जानेवारीला मित्रांसोबत फिरायला गेली होती. पण घरी परतली नाही. तिची सर्वत्र शोधाशोध केल्यानंतर १६ जानेवारीला भागवतटोलाजवळ ती जखमी अवस्थेत आढळली. तिला गंभीर जखमा होत्या आणि ती बेशुद्ध अवस्थेत पडून होती. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी रामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पण केवळ अपघाताची कलमे लावण्यात आली. याप्रकरणी अपहरण, बलात्कार, हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पण पोलिस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करीत आहेत.
नक्की वाचा - अन् पराभूत उमेदवार झाला विजयी; ३ दिवसांच्या आंनदोत्सवावर विरजण; नक्की काय घडला प्रकार
अपहरण, बलात्कार, हत्येचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीला पोलिस अजिबात प्रतिसाद देत नाहीत. म्हणून भोयर दाम्पत्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. शहरातील डॉ. आंबेडकर चौकात धावत्या पोलीस वाहनासमोर झोपून आत्मदहनाचा प्रयत्न दोघांनीही केला. वेळीच पोलिसांनी त्यांना उचलल्यामुळे त्यांचा प्रयत्न फसला. पोलिसांनी त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. या घटनेमुळे गोंदिया शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलिस प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
संपादन - अथर्व महांकाळ