गावात मृत्यू झाला की म्हैस जाते अंत्यविधीला; पाहा व्हिडिओ

गजानन भोयर
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

वाशिम जिल्ह्यातील वनोजा येथील राणी नावाची म्हैस गावात कोणाचाही मृत्यू झाल्यास ती अंत्यसंस्काराला जात असल्याने गावातच नाही तर परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील वनोजा येथील राणी नावाची म्हैस गावात कोणाचाही मृत्यू झाल्यास ती अंत्यसंस्काराला जात असल्याने गावातच नाही तर परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

आपण राज्यभरात पाळीव प्राण्यांचे वेगवेगळे विषय बघितले, अण्णा, अण्णा म्हणणारा कोंबडा असो वा सांगलीतील मालकाविना दूध घेवून जाणारा बैल असे अनेक प्राणी आपण बघितले, त्यातच आता ही म्हैस चर्चेेचा विषय बनली आहे.

मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील गोवर्धन राऊत यांच्याकडे चार म्हशी आहेत. त्यापैकी एक असलेली राणी नावाची म्हैस गेल्या अनेक दिवसांपासून गावात अंत्ययात्रा निघाली की सोबत जाते,संपूर्ण अंत्यसंस्कार उरकेपर्यंत स्मशानभूमीत थांबते ज्यावेळी गावकरी माघारी परततात त्यावेळी ती ही वापस येते. त्यामुळे गावासह अंत्यविधीला येणाऱ्या पाहुणे मंडळीत कुतुहुलाचा विषय बनला आहे.

 

वनोजा गावातील मृत्यू झाल्यास म्हैस अंत्यविधीला जात असल्यामुळे गावातील नागरिक म्हैशीच्या अंगात गावातील आत्मा असल्याचं सांगतात. मुक्या जिवाचा माणसावर असलेला जिव वेगवेगळ्या घटनांनी समोर येतो. मात्र माणूस मरण पावल्यानंतर नातेवाईकांसारखे अंत्ययात्रेत सहभागी होवून अस्थिविसर्जनालाही हजर राहणारी म्हैस चर्चेचा विषय झाली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: buffalo goes to funeral when any person died in the village

टॅग्स