गडचिरोली - आरमोरी येथील हिरो कंपनीच्या शोरूमची इमारत कोसळल्याने मलब्याखाली दबून तीन जण जागीच ठार, तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवार (ता.८) संध्याकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास घडली..आकाश ज्ञानेश्वर बुराडे (वय-२५) रा. निलज, ता. ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर, तहसीन इस्राईल शेख (वय-३०) व अफसान शेख (वय-३२), दोघेही रा.देसाईगंज, जि. गडचिरोली, अशी मृतांची नावे आहेत. या दुर्घटनेत सौरभ चौधरी (वय-२५) रा. मेंडकी, विलास मने (वय-५०) व दीपक मेश्राम (वय-२३) दोघेही रा. आरमोरी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे..आरमोरी येथे पंचायत समिती जवळच्या भगतसिंह वॉर्डात एका जुन्या इमारतीत लालानी यांची हिरो मोटारसायकल कंपनीची शोरूम आहे. ही इमारत धोकादायक स्थितीत असतानाही तेथे शोरूम सुरू होती. शुक्रवारी तेथे कामगार वाहनांची दुरुस्ती करीत होते, तर काही नागरिक वाहनांचे सुटे भाग खरेदी व नव्या वाहनांविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आले होते..संध्याकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास अचानक इमारतीचा मागचा भाग कोसळला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या अपघातात जखमी झालेले विलास मने हे तेथे मेकॅनिक होते.तिन्ही जखमींची हाडे तुटली असून त्यांच्यावर आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गुरुवार (ता. ७) गडचिरोलीनजीकच्या काटली येथे ट्रकने धडक दिल्याने चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शुक्रवारी आरमोरीत इमारत दुर्घटनेत तीन जणांना प्राण गमवावे लागले. या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे..गुन्हा दाखल करण्याची मागणी...आरमोरी येथील हिरो शोरूमची इमारत मोडकळीस आल्यानंतरही इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. यामुळे तीन निष्पाप नागरिकांचा जीव गेला. यासाठी इमारत मालक आणि नगर परिषद प्रशासन जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते रामदास जराते, श्यामसुंदर उराडे, जयश्री जराते, आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, धर्मानंद मेश्राम, विनोद मडावी यांनी केली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.