Buldana : भोकरदन जवळील अपघातात बुलडाणा जिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 accident

Buldana : भोकरदन जवळील अपघातात बुलडाणा जिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यू

बुलडाणा : जालना जिल्ह्यातील भोकरदन जवळ प्रवासी ऑटो रिक्षा व आयशर ट्रक मध्ये झालेल्या धडकेत बुलडाणा जिल्ह्यातील पाच जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन बालकांसह महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. हे सर्व देऊळगाव राजा येथील रहिवासी असल्याचे कळते.

प्राप्त माहितीनुसार भोकरदन कडून जाफराबाद कडे जाणाऱ्या प्रवासी ऑटो रिक्षा ला भरधाव येणाऱ्या आयशरने माहोरा गावाजवळील शिवम ढाब्याजवळ जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की या अपघातात ऑटो रिक्षातील सात पैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर दोघांना माहोरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना जालना येथे हलविण्यात आले.

मृतकांची नावे : परवीन बी राजू शहा (वय 25), आलिया राजू शहा (वय 7), मुस्कान राजू शहा (वय3) कैफ अशपाक शहा (19), मनीष बबन तिरुखे (वय 26) वर्ष राहणार त्रंबक नगर तालुका देउळगाव राजा तर जखमीमध्ये -सानिया शाह 9 वर्ष बालू खरात 23 वर्ष यांचा समावेश आहे. सर्वजण एकाच कुटुंबातील असून हे एका कार्यक्रमानिमित्ताने एकत्रित रित्या ऑटो रिक्षाने गेले होते, अशी माहिती मिळाली.