esakal | बुलडाण्यात आणखी पाच जण कोरोना मुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

buldana five patient are corona negative marathi news

येथील महिला रुग्णालयात 8 आयसोलेशन  कक्षात दाखल असलेल्या आणखी पाच जणांची तिसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आठ वर पोहोचली आहे.

बुलडाण्यात आणखी पाच जण कोरोना मुक्त

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बुलडाणा  : येथील महिला रुग्णालयात 8 आयसोलेशन  कक्षात दाखल असलेल्या आणखी पाच जणांची तिसरी टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांची मुक्तता करण्यात आली. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या आठ वर पोहोचली आहे.

दोनच दिवसांपूर्वी तीन जणांना मुक्त करण्यात आले होते. आयसोलेशन कक्षात बाराजण ठेवण्यात आलेले आहेत. आज मुक्त केलेल्यांमध्ये जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, देऊळगाव राजा  तसेच चिखली येथील रुग्णाचा समावेश आहे. हे सर्वजण दिल्ली येथील कार्यक्रमाशी निगडित असल्याचे जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांसह याठिकाणी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.  प्रेमचंद पंडित व आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सर्व कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी या रुग्णांची सुटका झाल्यामुळे टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. आता बुलडाणा जिल्हा रेड झोन मधून ऑरेंज शहर मध्ये येईल अशी चर्चा होती,  मात्र आगामी 28 दिवसात एकही नवीन रुग्ण आढळला नाही, तरच हा जिल्हा दुसऱ्या झोनमध्ये जाऊ शकतो असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

loading image