बुलडाणा : जमीन संपादन करण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Samant

बुलडाणा : जमीन संपादन करण्याचे उद्योगमंत्र्यांचे आदेश

बुलडाणा : एमआयडीसीच्या निर्मितीनंतर तब्बल पन्नास वर्ष प्रथमच आमदार संजय गायकवाड यांनी बेरोजगारीचा प्रश्न सुटावा, मोठ- मोठे उद्योगधंदे उभे राहावे यासाठी विकासात्मक दृष्टिकोन ठेवून बुलडाणा एमआयडीसीकरीता वाढीव ५०० एकर आणि मोताळा करिता ६५० एकर जमीन संपादन करण्याचे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिले. याकरिता आमदार संजय गायकवाड यांनी भरीव पाठपुरावा केला.

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी राज्यात एमआयडीसी निर्मिती करण्यात आली होती. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात अत्यल्प जमिनी संपादन करण्यात आल्या होत्या. त्याच वेळी बुलडाणा शहराला लागून असलेल्या जळगाव भागात केवळ २५ एकर आणि मोताळा करिता २५ एकर जमीन संपादित केलेली होती. यापेक्षा अधिक जमीन चिखली नांदुरा आणि खामगाव एमआयडीसी करिता राखीव होती. यामध्ये वरील सर्व तालुक्याचे ठिकाण असणार्‍या एमआयडीसी करिता प्रत्येक ५०० एकर एवढी जमीन संपादित आहे.

यामध्ये खामगाव एमआयडीसीला पुन्हा दुप्पटीने जमीन वाढीव देण्यात आली. मात्र, बुलडाणा व मोताळा तालुक्यासाठी अत्यल्प जमीन असल्याने उद्योग व्यापार उभे राहू शकले नाही ही बाब आमदार संजय गायकवाड यांनी लक्षात घेऊन त्यांनी आमदार होताच पाठपुरावा सुरू केला. सातत्याने अखेर याविषयी त्यांना यश आले. उद्योग मंत्री सावंत यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आणि पुढील एका महिन्यात जमिनी सर्वेक्षणाचे आदेश उद्योग मंत्र्यांनी दिले महिनाभरात सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल तयार करून किती शेती संपादन करावी लागेल व किती जागा व बजेट लागेल हा अहवाल शासनास सादर होणार आहे अशी माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली.

टेक्स्टाईल पार्क उभारणार राजकारणाचा मुद्दा ठरलेला टेक्स्टाईल पार्क आपलाच मार्गदर्शनात होईल असा आत्मविश्वास व्यक्त करीत अनेकांनी केवळ राजकारण केले. मात्र मोताळा तालुक्यात ६५० एकर जमीन केवळ टेक्स्टाईल पार्कसाठी राहणार असून यातील काही एकर जमीन ही ई क्लास साठी राहणार आहे. या जागेवर मोठ- मोठे उद्योग व कंपन्या, कारखाने सुरू करून शेकडो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Web Title: Buldana Industries Minister Order Acquire Land Mla Sanjay Gaikwad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..