Buldhana News : देशी दारू दुकान बंदीसाठी महिलांचे १८ दिवसांपासून आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Buldhana News in Marathi, Buldhana Latest Marathi News

Buldhana: देशी दारू दुकान बंदीसाठी महिलांचे १८ दिवसांपासून आंदोलन

लोणार : तालुक्यातील बिबी येथे स्थलांतरित करण्यात आलेल्या देशी दारूच्या दुकानावर गावकर्‍यांनी आक्षेप घेतला आहे. त्या संदर्भात अधिनस्त यंत्रणेमार्फत चौकशी करून सदर ग्रामसभा नियमानुकुल बाबत योग्य तो निर्णय घ्यावा तो पर्यंत ग्रामसभेची अंमलबजावणी करू नये असा स्पष्ट आदेश अमरावती विभागीय आयुक्तांनी दिल्यानंतरही बुलडाणा जिल्हा परिषदेने ठरावाबाबत कोणतीही पुढाकार घेतला नाही. दारू दुकान बंद करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यांना असताना, जिल्हाधिकार्‍यांनीही महिलांच्या अठरा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेतली नाही.(Buldhana News in Marathi)

बिबी येथील सुनीता भांड, जिजाबाई सदावर्ते आणि लता घाईत या महिलांनी १७ जूनपासून बिबी येथील सरकार मान्य देशी दारूच्या दुकानासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. त्याच दिवशी सायंकाळ पासून त्यांनी दारूचे दुकान गाठत तेथेच ठिय्या आंदोलनाला सुरवात केली होती. सदरचे दुकान हे चंद्रपूर येथून बिबी येथे स्थलांतरित करण्यात आले आहे. या दारू दुकानासाठी ग्रामपंचायतीचा घेतलेला ठराव हा चुकीचा व खोटा असून तसेच हे दारू दुकान स्थलांतर करण्यासाठी देण्यात आलेले नाहरकत प्रमाणपत्र सुद्धा गैर कायदेशीर व तत्कालीन सरपंच यांनी स्वत:च्या फायद्यासाठी ग्रामस्थांची फसवणूक केल्याचा आरोप करीत बिबी येथील सुनीता भांड, जिजाबाई सदावर्ते आणि लता घाईत या माहिलांनी जिल्हाधिकारी यांच्यासह मुख्यमंत्र्याकडे तक्रारी केल्या होत्या. आता मुख्यमंत्री बदलले आहेत. त्यामुळे नवनी राजवटीने या तक्रारीची दखल घ्यावी, अशी अपेक्षा या महिलांना आहे.

Web Title: Buldana Local Liquor Shops Ban Women Agitation For 18 Days District Collector

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top