Buldana
Buldanasakal

बुलडाणा : लम्पी लसीकरणाचा घेतला आढावा

माजी नगराध्यक्ष खांडेभराड यांनी घेतली पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट

देऊळगावराजा : तालुक्यात लम्पी त्वचा रोग या गोवंशातील नवीन साथीच्या रोगाने काही जनावरे बाधित झाली असून माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड व राष्ट्रवादीचे नेते समाधान शिंगणे यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन लम्पी रोगासंदर्भात राबविण्यात येणाऱ्या लसीकरणाच्या संदर्भात आढावा घेतला. व पशुसंवर्धन विभाग अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

जनावरांतील एक नवीन साथीचा रोग हळूहळू डोके व र काढत असून स्थानिक पशुवैद्यकीय दवाखाना अंतर्गत येणाऱ्या २२ गावांपैकी सावखेड भोई, भिवगाव, जुमडा व दिग्रस या चार गावात या रोगाचे बाधित जनावरे आढळून आली आहे. जनावरांमध्ये संसर्गजन्य असणाऱ्या या भयंकर रोगापासून तालुक्यातील गोवंशाचे कसे संरक्षण होईल यासाठी अध्यक्ष संतोष खांडेभराड, तालुका दूध संघाचे अध्यक्ष समाधान श्रीधर शिंगणे यांनी भेट घेऊन चर्चा केली. यावेळी संसर्ग रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभागामाफत केल्या जाणाऱ्या पर्यायी उपाययोजना संदर्भात आढावा घेतला.

याप्रसंगी माहिती देताना पशुवैद्यकीय अधिकारी संदीप उदार व डॉ. कोल्हे यांनी लम्पी रोगावर जनावरांना देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक ४ हजार ५०० लसीकरण पूर्ण करण्यात आल्याचे सांगितले. तर ५ हजार लस उपलब्ध होणार असून याबाबतचे नियोजन केले असल्याचे सांगितले. यावेळी प्रशासनाने जनावरांचा आठवडी बाजार बंद करूनही शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जालना जिल्ह्यातील शिवारात जनावरांचा बाजार भरविण्यात आल्याबद्दल पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले.

तर येत्या आठवड्यात भरविण्यात येणाऱ्या सदर जनावरांच्या बाजारावर प्रतिबंध घालण्याची मागणी संतोष खांडेभराड व समाधान शिंगणे यांनी केली. याप्रसंगी दक्षता समितीचे सदस्य सुरेश तिडके, युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अरविंद खांडेभराड, राष्ट्रवादी नेते धनंजय मोहिते, सुनील शेजुळकर यांची उपस्थिती होती.

जनावरांमध्ये लम्पी रोगाची लागण झाल्याबरोबर खबरदारी घेतल्यास किमान दहा दिवस ते एका महिन्यात बाधित जनावर बरा होऊ शकते. पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागामाफत राबविण्यात येणाऱ्या लसीकरण मोहिमेत आपल्या पशूंना लसीकरण करून घ्यावे.

- डॉ.संदीप उदार, पशुसंवर्धन अधिकारी, देऊळगावराजा.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com