बुलडाणा : ५ कोटी ७ लाख रुपयांच्या कामांचे भूमिपूजन

आ. संजय गायकवाड यांचा मतदारसंघात विकासकामांचा झंझावात
Buldana mla Sanjay Gaikwad constituency development works Bhumipujan
Buldana mla Sanjay Gaikwad constituency development works Bhumipujan

मोताळा : आव्हा, टाकळी घडेकर, चिंचखेड खुर्द व माळेगाव येथील पाच कोटी रुपये निधीच्या पाणीपुरवठा योजनेसह मोताळा तालुक्यातील तब्बल ५ कोटी ७ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांच्या हस्ते रविवारी (ता. २१) संपन्न झाला. आमदार संजय गायकवाड यांचा मतदारसंघात विकासकामांचा झंझावात सुरू असून, रविवारी मोताळा तालुक्यातील ५ कोटी ७ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. या विकासकामांमध्ये पिंप्री गवळी येथे व्यायामशाळा बांधकाम करणे (निधी - ७ लाख रु.) तसेच टाकळी घडेकर, आव्हा, चिंचखेड खुर्द व माळेगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत प्रादेशिक पाणीपुवठा योजना (निधी - रु. ५०० लाख रु.) या विकासकामांचा समावेश आहे.

आ. संजय गायकवाड यांचा मतदारसंघात विकासकामांचा धडाका सुरू केला आहे. त्यांच्या विकासकार्याने पंचक्रोशीतील परिसर प्रभावित झाला असून, आपल्या आमदारांची कामगिरी दमदार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. दरम्यान, मोताळा तालुक्यासह बुलडाणा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही आ. गायकवाड यांनी दिली आहे. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं. सदस्य, अंगणवाडी सेविका व गावकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

रस्त्यांच्या विकासकामांसाठी ५० कोटींचा निधी मंजूर

काही दिवसांपूर्वी आमदार धर्मवीर संजय गायकवाड यांनी बुलडाणा मतदारसंघातील पुरवणी अर्थसंकल्पात रस्ते विकास कामांसाठी बजेटमध्ये तब्बल ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. सातत्याने कोट्यवधी रुपयांचा निधी खेचून आणून मतदासंघात विकासाचे नवीन पर्व सुरू केल्याबद्दल आ. संजय गायकवाड यांचे सर्वच स्तरातून कौतूक होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com