
लॉकडाऊनमध्ये देखील अवैध रित्या रेती वाहतूक करणार्या टिप्परचालकावर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला टिप्पर चालकाने धडक देऊन गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे तर आपले वाहन रिव्हर्स घेऊन पोलिसाला चिरडल्याची घटना शेगाव तालुक्यातील जलंब माटगाव दरम्यान घडली.
खामगाव (जि.बुलडाणा) : लॉकडाऊनमध्ये देखील अवैध रित्या रेती वाहतूक करणार्या टिप्परचालकावर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने पाठलाग करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला टिप्पर चालकाने धडक देऊन गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे तर आपले वाहन रिव्हर्स घेऊन पोलिसाला चिरडल्याची घटना शेगाव तालुक्यातील जलंब माटगाव दरम्यान घडली.
लॉकडाऊनमध्ये सुद्धा पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक सुरू आहे. यामध्ये आज बुधवारी पहाटे 4 वाजता शेगाव तालुक्यातील माटरगाव, भास्तन गावाजवळील पूर्णा नदीच्या काठावर वरून एक विना क्रमांकाचे टिप्पर रेती घेऊन खामगाव शहरकडे जात असल्याची माहिती जलंब पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल उमेश सिरसाट यांना मिळाल्यावरून त्यांनी एका होमगार्डला सोबत घेऊन मोटरसायकलने भरधाव वेगाने जाणाऱ्या टिप्परचा पाठलाग केला सदर टिप्पर हे माटरगावच्या पुढे पोहचले असता पोलिसाने मोटर सायकल टिप्पर पुढे आडवी करून वाहन थांबविले.
दरम्यान टिप्पर चालकाने आपले वाहन थेट पोलीस कॉन्स्टेबल उमेश सिरसाट यांच्या अंगावरून नेले. घटना घडताच सोबत आलेला होमगार्ड घटनास्थळावरून पळून गेल्या मात्र पोलीस ठार झाला की नाही ही खात्री करण्यासाठी टिप्पर चालकाने आपले वाहन रिव्हर्स घेऊन रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडलेल्या उमेश शिरसाट याना पुन्हा चिरडले. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी घटनासथळावर पोहचले असून सकाळपासून सदर वाहनाचा शोध सुरु आहे.