स्वाभिमानीला दिलेला शब्द राष्ट्रवादी पाळणार का?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 May 2020

जगात सगळीकडे कोरोना विषाणूंचा प्रकोप असतानाच महाराष्ट्रात आता विधान परिषद निवडणुकीच्या चर्चांना वेग आला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बुलडाण्यातील लोकसभा मतदार संघाच्या बदल्यात विधान परिषदेची जागा देऊ असा शब्द राष्ट्रवादीने स्वाभिमानीला दिलेला होता.  तो शब्द पाळण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.

 

बुलडाणा : जगात सगळीकडे कोरोना विषाणूंचा प्रकोप असतानाच महाराष्ट्रात आता विधान परिषद निवडणुकीच्या चर्चांना वेग आला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी बुलडाण्यातील लोकसभा मतदार संघाच्या बदल्यात विधान परिषदेची जागा देऊ असा शब्द राष्ट्रवादीने स्वाभिमानीला दिलेला होता.  तो शब्द पाळण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.

 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना शेवटच्या टप्प्यात दोन जागांसाठी आक्रमक होती. यापैकी एक राजू शेट्टी यांचा हातकणंगले  मतदारसंघ व दुसरा बुलडाणा लोकसभा मतदार संघ होता.  बुलडाण्यातील स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी देखील लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी केली होती आणि निवडणूक लढवायची असे ठरविले होते, मात्र निवडणुकीदरम्यान चर्चांच्या अनेक फेरी झाल्या यामध्ये निर्णायक टप्प्यावर बुलडाणा लोकसभेचा आग्रह स्वाभिमानीने सोडून द्यावा, त्या बदल्यात विधान परिषदेसाठी त्यांना संधी देऊ असा शब्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला असल्याचे स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांनी सरकार नामाशी बोलताना सांगितले. शिवाय डॉक्टर शिंगणे यांच्या प्रचारासाठी श्री. तुपकर यांनी जिल्हाभर रान उठविले होते.

कोणतीही तमा न बाळगता त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला होता. त्यामुळे पराभूत  निकालानंतर त्यांना अनेकांच्या रोषाचा सामनाही करावा लागला होता. 

 आता महाराष्ट्रात विधान परिषदेचा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्यात अस्थिर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या निवडणुका मुदतीपूर्वी घेण्याला मान्यता दिली आहे. त्यामुळे कुणाला संधी मिळणार या चर्चा सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीकडे सुमारे पन्नास जणांनी आपल्याला संधी द्यावी, अशी मागणी केलेली आहे. मात्र या मागणी सोबतच पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वाभिमानीला दिलेला शब्दही लक्षात ठेवावा लागणार आहे. तो शब्द पाळण्याची वेळ आल्यास बुलडाण्यातील युवानेते रविकांत तुपकर यांचा दावा तर असेलच,  परंतु उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय मात्र राजू शेट्टी करतील हे निश्चित !


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: buldana swabhimani promis by rashtrawadi congress